आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi : Adhir Ranjan Said Amit Shah And Narendra Modi Are Intruders Themselves; Moved From Gujarat To Delhi

नरेंद्र मोदी आणि अमित शाह स्वतःच घुसखोर, घर गुजरातमध्ये मात्र आले दिल्लीत; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह स्वतःच घुसखोर आहेत. त्यांचे घर गुजरातमध्ये आहे मात्र हे लोक दिल्लीत आले असे ते म्हणाले. भारत प्रत्येकासाठी आहे. हा कुणाची जहागीर आहे का? असे चौधरी म्हणाले. चौधरी पुढे बोलताना म्हणाले की, भारत हिंदू, मुस्लिम सर्वांसाठी आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. मुस्लिमांना देशाच्या बाहेर फेकण्याची भाषा ते करत आहेत. मात्र असे करण्याची त्यांच्याकडे हिंमत नाहीये. पण भारतात फक्त हिंदूंनाच राहण्याची परवानगी आहे असे दाखवण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे चौधरी म्हणाले. दरम्यान अमित शाह यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकावर ईशान्येकडील राजकीय पक्ष आणि नागरी संस्थांशी चर्चा केली. अमित शाह याबाबत आपली पुढील बैठक 3 डिसेंबर रोजी घेणार आहेत.अमित शाह म्हणाले होते - हा कायदा धर्माच्या आधारे बहिष्कृत गैर-मुस्लिमांसाठी आहे


गृहमंत्री अमित शाह लोकसभेत म्हणाले होते की, पाकिस्तान, बांगलादेश. अफगाणिस्तानमधून धर्माच्या नावावर बहिष्कृत केलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, पारसी निर्वासितांना भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आवश्यकता आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 8 जानेवारी 2016 रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले होते. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या गैर-मुस्लिम लोकांना भारतीय नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2016 राज्यसभेत मंजूर झाले नव्हते


नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 8 जानेवारी 2016 रोजी लोकसभेत मंजूर झाले होते. मात्र राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही. यामुळे लोकसभेची मुदत संपताच हे विधेयकही संपुष्टात आले होते.  31 डिसेंबर 2014 पासून पूर्व भारतात राहणारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लिम नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल अशी यात तरतूद आहे.