आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आम आदमी पक्षाने यंदा दोनच दिवसांत 28 लाख रुपयांचा निधी गोळा केला. आपने हा निधी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून मिळवला असून यात 1300 हून अधिक लोकांचा सहभाग होता. त्यातील 75 टक्के लोकांनी 1 हजार रुपयांपेक्षा कमी दान करून हे लक्ष्य गाठले आहे. लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर आम आदमी पक्षाने क्राउड फंडिंग मोहिम बंद केली आहे. ठरवलेले लक्ष्य अवघ्या 48 तासांत पूर्ण झाल्याने ही क्राउड फंडिंग बंद करण्यात आली अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केले.
दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आम आदमी पक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडून प्रचारासाठी लागणारा निधी गोळा करत आहे. आपचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ऑनलाइन फंड रेज मोहिमेची सुरुवात केली होती. त्यांनी निधी देणाऱ्यांना सांगितले होते, की आम्ही दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये व्यापक बदल घडवून त्यात जागतिक दर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी हा निधी मिळवताना नागरिकांना आपला समर्थन देण्याचे आवाहन केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.