आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Assembly Election 2020: AAP And CM Kejriwal Launches Campaing Song For Delhi Election

विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आपचे 'लगे रहो केजरीवाल' कॅम्पेन साँग रिलीज, केजरीवालांनी केला ट्विट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी आम आदमी पक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक कॅम्पेन साँग लाँच केले आहे. खास निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले हे गीत प्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार आणि गीतकार विशाल ददलानी यांनी तयार केले आहे. ''लगे रहो केजरीवाल'' या गाण्याचा वापर संपूर्ण प्रचार प्रक्रियेत केला जाणार आहे. हे गाणे ददलानी यांनीच गायले आहे. तत्पूर्वी त्यांनी या गाण्याचे टीझर देखील आपल्या ट्विटर हँडलवर लाँच केले होते. यानंतर केजरीवाल यांनी हे गाणे आपल्या ट्विटर अकाउंटवर जारी केले आहे.