Home | Sports | From The Field | Delhi Capitals team thrilled; victory for the first time in the playoffs

दिल्ली कॅपिटल्स संघाचा थरारक विजय; पहिल्यांदाच मिळवले प्ले ऑफमध्ये यश

वृत्तसंस्था | Update - May 09, 2019, 08:21 AM IST

दिल्ली कॅपिटल्स संघाचा थरारक विजय; पहिल्यांदाच मिळवले प्ले ऑफमध्ये यश

 • Delhi Capitals team thrilled; victory for the first time in the playoffs

  विशाखापट्टणम - सलामीवीर पृथ्वी शॉ (५६) आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (४९) धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर आयपीएलच्या १२ व्या सत्रात बुधवारी २ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने पहिल्यांदा प्ले ऑफचा सामना जिंकला. आता दिल्लीचा क्वालिफायर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध १० मे रोजी विशाखपट्टणम येथे होणार आहे.


  प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.५ षटकांत ८ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात पृथ्वी शॉने ३८ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकार खेचत ५६ धावा ठोकल्या. शिखर धवन १७ व कर्णधार श्रेयस अय्यर ८ धावा करून परतले. मुनरोने १४ धावा जोडल्या. पाऊल ५ धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. दीपक हुडाने एकाला टिपले.

  ऋषभ पंतचे शानदार अर्धशतक
  युवा फलंदाज व विश्वचषकासाठी राखीव म्हणून निवड झालेल्या ऋषभ पंतने आपल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या विजयासाठी मोलाचे योगदान दिले. त्याने मधल्या फळीत संघाची एक बाजू लावून धरत शानदार ४९ धावांची खेळी केली. त्याने अवघ्या २१ चेंडंूचा सामना करताना २ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले. अखेरच्या षटकात तळातील फलंदाज अमित मिश्राला (१) मैदानात अडथळा निर्माण केल्यामुळे बाद देण्यात आले. सामन्यात रंगत आली होती.

  सनरायझर्स हैदराबादच्या १६२ धावा
  हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर वृद्धिमान साहा अवघ्या ८ धावांवर बाद झाला. गुप्टीलने १९ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांसह ३६ धावा केल्या. मनीष पांडेने ३६ चेंडूत ३० धावा काढल्या. कर्णधार केन विल्यम्सनने २७ चेंडूत २ चौकारांसह २८ धावा जोडल्या. विजय शंकरने ११ चेंडूत फटकेबाजी करत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावा ठोकल्या. मोहंमद नबी २० धावा करून परतला. दिल्लीच्या पाऊलने ३२ धावांत ३ फलंदाज टिपले. ईशांत शर्माने ३४ धावांत २ आणि अमित मिश्राने एकाला बाद केले.

Trending