Home | Sports | From The Field | Delhi Capitals won against KKR

सर्वाेत्तम नाबाद खेळीसह शिखर धवनचे ५० वे अर्धशतक; दिल्लीचा विजयी चाैकार

वृत्तसंस्था | Update - Apr 13, 2019, 09:13 AM IST

दिल्ली कॅपिटल्सने १८.५ षटकांमध्ये ७ गड्यांनी जिंकला रंगतदार सामना

  • Delhi Capitals won against KKR

    काेलकाता - शिखर धवन (९७) अाणि ऋषभ पंतच्या (४६) झंझावाती खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. श्रेयस अय्यरच्या दिल्ली संघाने लीगमधील आपल्या सातव्या साामन्यात दाेन वेळच्या चॅम्पियन यजमान काेलकाता नाइट रायडर्स संघाचा पराभव केला. दिल्लीच्या संघाने १८.५ षटकांमध्ये सात गडयांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह दिल्लीने स्पर्धेत विजयाचा चाैकार मारला. या विजयाने दिल्लीच्या टीमला गुणतालिकेमध्ये चाैथ्या स्थानावर धडक मारता आली. दुसरीकडे काेलकाता संघाला लीगमध्ये तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र तरीही काेलकाता संघ गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यजमान टीमचा घरच्या मैदानावर दिल्लीला राेखण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

    प्रथम फलंदाजी करताना काेलकाता नाइट रायडर्स संघाने ७ गड्यांच्या माेबदल्यात दिल्लीसमाेर विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दिल्लीने ३ गडी गमावून १८० धावा काढल्या. यासह दिल्लीने विजय साकारला.

    शिखर धवनची सर्वाेत्तम खेळी; २३४ वी टी-२० मॅच गाजवली

    दिल्लीच्या स्फाेटक फलंदाज शिखर धवनने आपल्या करिअरमधील २३४ वा टी-२० सामना गाजवला. त्याने टी-२० मध्ये सर्वाेत्तम खेळीची नाेंद केली. त्याने आयपीएलमध्ये काेलकाता संघाविरुद्ध नाबाद ९७ धावा काढल्या. ही त्याची यातील सर्वाेत्तम खेळी ठरली. यासह त्याने ५० वे अर्धशतक साजरे केले. मात्र, अवघ्या तीन धावांनी त्याचे आयपीएलमधील शतक हुकले.

Trending