IPL 2019 / जडेजा १०.५ चेंडूंनंतर, तर मिश्रा ९.८ चेंडूंनंतर देताे एक बाउंड्री; फायनलसाठी आज दिल्ली-चेन्नई सुपरकिंग्ज झुंजणार

धोनी, पत्नी साक्षी अाणि मुलगी  जीवासाेबत विशाखापट्टनमध्ये दाखल. धोनी, पत्नी साक्षी अाणि मुलगी जीवासाेबत विशाखापट्टनमध्ये दाखल.

चेन्नई व दिल्ली, गाेलंदाजी दाेन्ही संघांची मजबूत

वृत्तसंस्था

May 10,2019 10:27:00 AM IST

विशाखापट्टणम - गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज शुक्रवारी आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना हाेणार आहे. हे दाेन्ही संघ विशाखापट्टणमच्या वायएसआर रेड्डी स्टेडियमवर समाेरासमाेर असतील. दिल्लीच्या युवा टीमने एलिमिनेटर सामन्यात हैदराबादचा पराभव केला. या विजयाच्या बळावर दिल्लीने फायनलमधील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील विजेत्या टीमची फायनल रविवारी तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाेबत हाेणार आहे.


चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील गाेलंदाजांची भूमिका यंदाच्या सत्रात अधिक महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी ठरली. दिल्लीच्या युवा गाेलंदाजांपाठाेपाठ फलंदाजांनीही सरस खेळी करताना आपल्या टीमची विजयी माेहीम कायम ठेवली.


दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जच्या धाेनीने सातत्याने शानदार खेळी करताना आपला दबदबा कायम ठेवला. मात्र, टीमचे इतर फलंदाज फाॅर्मात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दाेन्ही संघांची मदार ही गाेलंदाजीवर असेल.चेन्नई टीमकडे हरभजन, रवींद्र जडेजा आणि इम्रान खान हे फिरकीपटूचे त्रिकूट आहेे. न्यूझीलंडचा सॅटनरही अव्वल कामगिरी करत आहे.


१७ गाेलंदाजांचे लीगमध्ये १०० पेक्षा अधिक डाॅट बाॅल; यातील सात दिल्ली-चेन्नईच्या संघातील
यंदाच्या सत्रात आतापर्यंत १७ गाेलंदाजांनी १०० पेक्षा अधिक डाॅट बाॅल टाकले. यातील सात गाेलंदाज हे प्रत्येकी चेन्नई आणि दिल्ली संघाचे आहेत. या सात गाेलंदाजांमध्ये दीपक चाहर (१६३), ताहिर (१३५), रवींद्र जडेजा (११६), रबाडा (११३), इशांत (११२), हरभजन (१०२) आणि अक्षर पटेल (१००) यांचा समावेश आहे. दीपक चाहरने कोलकाताविरुद्ध चेपकवरील सामन्यात आपल्या काेट्यातील २४ पैकी २० बाॅल डाॅट टाकले.


१० सर्वाेत्कृष्ट स्ट्राइक रेट असलेल्या गाेलंदाजांमध्ये प्रत्येकी पाच दिल्ली आणि चेन्नईच्या टीममधील

यंदा सीजनच्या १० सर्वाेत्कृष्ट स्ट्राइक रेट असलेल्या गाेलंदाजांमध्ये प्रत्येकी पाच हे दिल्ली आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आहेत. याच यादीत कागिसाे रबाडा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने प्रत्येक ११.२८ चेंडूंनंतर एक विकेट घेतली आहे. त्यानंतर ताहीर (१४.९५), मॉरिस (१५.२३), हरभजन (१५.४२) आणि कीमो पॉल (१६.११) यांचा समावेश आहे. हैदराबाद टीमच्या खलील अहमदचा स्ट्राइक रेट सर्वाधिक चांगला ११ असा आहे.

ऋषभ पंत दिल्लीचा सर्वात माेठा मॅच विनर; टीमच्या विजयामध्ये आतापर्यंत ३६ टक्के याेगदान

एलिमिनेटर सामन्यात २१ चेंडूंवर ४९ धावांची तुफानी खेळी करून ऋषभ पंतने दिल्लीचा विजय निश्चित केला. त्यामुळे आता ताे लीगमध्ये दिल्लीचा सर्वात माेठा मॅच विनर खेळाडू म्हणून समाेर येत आहे. त्याचे आतापर्यंत विजयामध्ये ३६ टक्के याेगदान नाेंद झाले आहे.

X
धोनी, पत्नी साक्षी अाणि मुलगी  जीवासाेबत विशाखापट्टनमध्ये दाखल.धोनी, पत्नी साक्षी अाणि मुलगी जीवासाेबत विशाखापट्टनमध्ये दाखल.
COMMENT