आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Cm Arvind Kejriwal Launches Farishte Dilli Ke, To Provide Free Treatment After Accidents

दिल्ली सरकारने अपघातग्रस्तांसाठी आणली नवीन योजना; अपघातग्रस्ताला मोफत उपचार, पोहोचवणाऱ्यास रोख बक्षीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत अपघातग्रस्तांना महागडे उपचारही मोफत
  • रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अपघातग्रस्तांसाठी 'फरिश्ते दिल्ली के' योजनेचे औपचारिक लाँचिंग केले. यामध्ये दिल्लीत कुठल्याही अपघातग्रस्ताला मोफत उपचार दिले जाणार आहे. सीएम केजरीवाल आणि राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा सोमवारी सत्कार केला. केजरीवाल सरकारच्या माहितीप्रमाणे, या योजनेत आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक अपघातग्रस्तांना मदत करण्यात आली आहे. सरकारी योजनेत जी व्यक्ती अपघातग्रस्ताला मदत करून रुग्णालयात पोहोचवणार त्याला फरिश्ते असे म्हटले जाणार आहे.

केजरीवाल म्हणाले, "सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू होती. आता योजनेची गरज पाहता ती राज्यभर लागू केली जात आहे. आम्ही राजकीय नेते नाही. आम्हाला राजकारण करता येत नाही. ईश्वराने आम्हाला सरकारमध्ये पाठवून सेवा करण्याची संधी दिली. आतापर्यंत लोकांना सरकार किंवा पक्षावर विश्वास नव्हता. गेल्या 5 वर्षांपासून दिल्लीची जनता कर भरत आहे आणि त्यांना विश्वास आहे, की सरकार त्यांच्यासाठीच काम करत आहे."

...तर कदाचित निर्भया वाचली असती!
यापुढे केजरीवाल म्हणाले, अपघातानंतरचा पहिलाच तास गोल्डन आवर असतो. याच दरम्यान अपघातग्रस्ताला रुग्णालयात पाठवल्यास त्याचा जीव वाचवला जाऊ शकतो. पोलिस कुणालाही त्रास देणार नाही. निर्भया प्रकरणात सुद्धा ती रस्त्यावरच पडली होती. कुणीही तिला रुग्णालयात नेण्याची फिकीर केली नाही. तिला वेळेवर उपचार मिळाला असता तर कदाचित ती वाचली असती. आज 'फरिश्ते दिल्ली के' योजना लागू केली जात आहे. मला वाटते, की दिल्लीचा प्रत्येक नागरिकाने फरिश्ता (देवदूत) व्हावे. दिल्लीतील ऑटो रिक्शावाले आणि टॅक्सीवाले दादा यांनी देखील अपघातग्रस्तांची मदत करावी."

मदत करणाऱ्यास 2 हजारांचे बक्षीस, अपघातग्रस्तावर मोफत उपचार
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येन्द्र जैन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या योजनेत दिल्लीत अपघात होत असल्यास, आग किंवा अॅसिड हल्ल्यात कुणी जखमी झाल्यास त्याला जवळच्या सरकारी किंवा खासकी रुग्णालयात घेऊन जावे. त्याच्या उपचारावर लाखो रुपयांचा खर्च झाला तरी संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. सोबतच, रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा खर्च देखील सरकार देणार आहे. यात कुणालाही कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. अपघातग्रस्ताची मदत करणाऱ्याला 2 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. यात बहुतांश लोकांनी ही रक्कम घेण्यास नकार दिला. परंतु, प्रत्येक अपघातग्रस्ताचा जीव वाचवण्याचा दिल्ली सरकारने पुरेपूर प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...