आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतून... मोदींवरील गीतांद्वारे मते मागताहेत मनोज तिवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर पूर्व दिल्लीतील भजनपुरा मेन मार्केटचा परिसर. भोजपुरी कलाकार मनोज तिवारी मोदींचे गुणगान करणारी गीते ऐकवून मते मागत आहेत. गीताचे बोल आहेत-
भारतमाता है पीडा में, यह भीड पीडा की मूरत है।
नॉर्थ-ईस्ट ललकार रहा, देश पुकार रहा, अब मोदी की जरूरत है।
छोट्याशा रस्त्याने जाणारा मनोज तिवारी यांचा काफिला उस्मानपूर पुस्ताच्या दिशेने रवाना होतो. ते म्हणतात, आम्हाला मोदींच्या नावाचाच आधार आहे, हे खरे आहे. खरेतर निवडणूकच अशी आहे, की तिवारी खूपच भोळे बनले आहेत. ओठांवर फक्त मोदी, मनात केवळ भाजप. रहमान उस्मानपूरमध्ये एका मुस्लिम तरुणाने त्यांना विचारले, तुम्ही तर ‘सपा’मध्ये गेला होतात. तिवारी म्हणाले, नाही रे भय्या, मी तर कधी मनापासून तिथे नव्हतोच. निवडणूक लढलो होतो त्याबद्दल आजही खेद वाटतो.
येथील ‘आप’चे उमेदवार प्रा. आनंद कुमार म्हणतात, की मोदींची लाट असती, तर भाजपला भोजपुरी कलाकाराला शोधून हवा निर्माण करावी लागली नसती. काँग्रेसचे उमेदवार जे. पी. अग्रवाल मुस्तफाबादमध्ये लोकांसोबत संवाद साधत आहेत. त्यांचे लक्ष्यदेखील तिवारी व मोदीच असतात. जे. पीं.चे म्हणणे आहे, की तिवारींना पाच वर्षे तर परिसर जाणून घेण्यालाच लागतील. गाण्यांमुळे लोकांचे प्रश्न मात्र सुटू शकणार नाहीत.
छायाचित्र - प्रचारावेळी भजन सादर करणार्‍या गायकाच्या वेशभूषेतील भोजपुरी कलाकार मनोज तिवारी.