आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Repad By Relative Ran Away Then Strangers Gang Repad Her Now Delhi Court Gives Life Imprisonment To Rapists

नातेवाइकाने रेप केल्यावर पळून गेली मुलगी, ज्यांना मदत मागितली त्या नराधमांनीही तोडले अब्रूचे लचके, 7 वर्षांनी कोर्टाने दिला निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीच्या एका कोर्टाने 7 वर्षांनंतर बलात्काराच्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पीडितेवर तिच्या नातेवाइकानेच आणि नंतर काही अनोळखींनी बलात्कार केला होता. पीडितेवर जेव्हा दुष्कृत्य झाले, तेव्हा ती अल्पवयीन होती.

 

असे आहे प्रकरण...

नातेवाइकाच्या वासनेची शिकार बनल्यानंतर पीडितेने काही अनोळखींना मदत मागितली तर त्यांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. पीडितेवर जेव्हा बलात्कार झाला तेव्हा तिने नवरात्रीचे व्रत ठेवलेले होते.

एका इंग्रजी दैनिकानुसार, ही घटना 7 एप्रिल 2011 रोजीची आहे. मूळची उत्तर प्रदेशातील पीडिता आपल्या आईवडिलांसोबत फरिदाबादेत राहत होती. त्या दिवशी आरोपी आपल्या पत्नीसोबत पीडितेच्या घरी आला होता. आरोपी म्हणाला की, त्याच्या कंपनीत कर्मचाऱ्यांना गिफ्ट वाटले जात आहेत, पण एक अट ठेवली आहे. जो कर्मचारी आपल्या मुलीसोबत येईल त्यालाच गिफ्ट दिले जाईल. आरोपी म्हणाला की, माझी मुलगी घरी नाही, म्हणून पीडितेला मुलगी बनवून दुसऱ्या दिवशी सोबत नेण्यासाठी आईवडिलांकडे परवानगी मागितली.

 

मुलीला संध्याकाळी परत सोडतो म्हणत घेऊन गेला नराधम...
आरोपी म्हणाला की, संध्याकाळी तो मुलीला परत घरी आणून सोडीन. म्हणून आईवडिलांनी परवानगी दिली. आरोपी पीडितेला कंपनीत नेण्याऐवजी आपल्या घरी घेऊन गेला. दुसरीकडे, आरोपीची पत्नी पीडितेच्या आईवडिलांसोबत फरिदाबादेत एका डॉक्टरकडे गेली. 

आरोपी पीडितेला घरीच सोडून कंपनीत गेला, संध्याकाळी काही गिफ्ट सोबत घेऊन परतला. तो  म्हणाला की, कंपनीने कोणतेही गिफ्ट दिले नाही. मुलीला परत घरी सोडण्याची वेळ झाली तेव्हा आरोपीने आजारपणाचे नाटक केले. त्या वेळी त्या घरात ते दोघेचे होते. 

 

आधी नातेवाईक, मग इतरांनाही तोडले अब्रूचे लचके

आरोपीने मुलीवर एका परफ्यूमचा शिडकावा केला, यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला. यानंतर मुलगी तेथून पळून गेली.

यानंतर बिजेंदर नावाच्या व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने तिला कारमध्ये लिफ्ट दिली. यानंतर कारमध्ये परवीन आणि विनोद नावाचे आणखी दोन तरुण बसले. मग तिघांनीही पीडितेला मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एका वाटसरूने मुलीची आरडाओरड ऐकून पोलिसांना माहिती कळवली. नंतर चारपैकी तिघांना अटक करण्यात आली, परंतु ते वाचले.

 

अखेर 7 वर्षांनी मिळाला न्याय....

कोर्टाने दोषींना जन्मठेपेसोबतच साडेचार लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय कोर्टाने पीडितेला पाच लाख रुपये भरपाईचेही आदेश दिले आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...