आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Court Imposed Stay On Chanda Kochhar's Biopic Chanda Himself Appealed To Stop The Release

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदा कोचर यांच्या बायोपिकवर दिल्ली हायकोर्टाने लावला स्टे, स्वतः चंदा यांनी केली होती प्रदर्शन थांबवण्याची अपील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली हायकोर्टाने शनिवारी बंदी घातली. स्वतः चंदा कोचर यांनी त्यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांच्या माध्यमातून संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लावण्याची मागणी केली होती. चित्रपटाची कथा चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित आहे, असा दावा या वकिलांनी आपल्या याचिकेत केला होता.

होणार नाही चित्रपटाचे स्क्रिनिंग... 
'Chanda : A Signature that Ruined a Career' असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिल्ली हायकोर्टाने ऑनलाइन आणि ऑफलाइन या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवरही बंदी घातली आहे. सीबीआय आणि ईडी अद्याप चंदा कोचर यांची चौकशी करत आहेत.

घेतली गेली नाही परवानगी....
विजय अग्रवाल यांनी संबंधित चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली. चित्रपटाच्या शीर्षकातही चंदा कोचर यांच्या नावाचा उल्लेख आहे. या चित्रपटासंदर्भात चंदा कोचर यांची कुठलीही परवानगी घेतली गेली नव्हती. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्रीदेखील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंदा कोचर यांच्या आयुष्यावर उघड-उघड बोलतेय. याप्रकारचे बायोपिक आणि प्रमोशनल इंटरव्ह्यू चुकीचे आहे. यामुळे चौकशी प्रभावित होण्याची शक्यता आहे. वकीलांच्या या युक्तिवादानंतर हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.

इफ्फीत स्पेशल स्क्रिनिंग... 
या चित्रपटात अभिनेत्री गुरलीन चोप्रा हिने चंदा कोचर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर मनोज नंदवाना आणि एस अखिलेश्वरन याचे निर्माते आहे. अजय सिंह यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. गोव्यात सुरु असलेल्या 50 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियात येत्या 28 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता इफ्फीत चित्रपट प्रदर्शित केला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.