आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Deputy CM Manish Sisodia Hits Back Kangana Ranaut For Her Tax Related Comment Against The CCA Protest

कंगना रनोट म्हणाली - देश 3% लोकांच्या करावर अवलंबून, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया संतापले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अभिनेत्री कंगना रनोटच्या वक्तव्यावर संतापले आहेत. कंगनाने अलीकडेच वक्तव्य केले होते की, आपल्या देशातील केवळ 3 ते 4  टक्के लोक कर भरतात आणि बाकीचे त्यांच्यावर अवलंबून आहेत. एकापाठोपाठ एक ट्विट करून सिसोदिया यांनी कंगनाच्या दाव्याचा समाचार घेत तिचे वक्तव्य चुकीचे ठरवले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, देश 3% लोकांच्या करावर अवलंबून नाही. कामगारापासून ते अब्जाधीशांपर्यंत प्रत्येकजण कर भरतो. सिसोदिया यांनी कंगनावर निशाणा साधत म्हटले की, तिच्या कोट्यवधीच्या कमाईत रोजंदारी करणा-या मजुराचाही हातभार असतो. त्यामुळे कोण कोणावर अवलंबून आहे? याचा विचार तिने करायला हवा. 

कंगना म्हणाली होती... 
सोमवारी संध्याकाळी 'पंगा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी कंगनाने नागरीकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) निषेधावेळी होणा-या हिंसाचाराचा निषेध करत म्हटले की, "आपल्या लोकसंख्येच्या केवळ 3-4 टक्के लोक कर भरतात. उर्वरित त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे देशात तुम्हाला बसेस, गाड्या जाळण्याचा आणि गोंधळ घालण्याचा हक्क कोणी दिला? एका बसची किंमत खूप असते. ही नाममात्र रक्कम नसते आणि देशाची स्थिती अशी आहे की अनेक लोक कुपोषणाने मरत आहेत. "


कंगनाने आपल्या वक्तव्यात म्हटले की, "लोकशाहीच्या नावाखाली हिंसा भडकवणे योग्य नाही. आम्ही अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळात अडकलो आहोत. त्याकाळात अशा लोकांच्या विरोधात संप व्हायचा ज्यांनी आपल्यावर कब्जा केला होता. ते कर भरत नव्हते. त्यावेळी असे (निदर्शने करणे) करणे खरोखर चांगले होते.  पण आजच्या जगात लोकशाहीमुळे तुमचा नेता तुमच्यातून येतो. इटली किंवा जपानमधून कोणीही येत नाही. "मनीष सिसोदिया यांचे उत्तर
मनीष सिसोदिया यांनी कंगनाच्या विधानाचा उल्लेख असलेल्या न्यूज एजन्सी एएनआयच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, "हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे  हे चुकीचेच आहे. ते मानवता आणि कायद्याच्या विरोधात आहेत. परंतु हा देश केवळ 3% लोकांच्या टॅक्सवर अवलंबून नाही. देशातील रोजंदारी मजुरांपासून अब्जाधीशांपर्यंत प्रत्येक माणूस कर भरतो

सिसोदियांनी पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले, "बाजारपेठेतून एखादी माचिस  किंवा मीठाचे पॅकेट खरेदी करणारा रोजंदारीचा मजूरसुद्धा त्याची टॅक्ससह किंमत देतो. काही निवडक अब्जाधीशांकडून मिळणारा टॅक्स हा केवळ टॅक्स होत नाही.

तिसर्‍या ट्वीटमध्ये सिसोदियांनी लिहिले, "आणि हो! एक सामान्य रोजंदारी मजुरीसुद्धा जेव्हा सिनेमा बघायला जातो तेव्हा सिनेता-यांच्या कोट्यवधींच्या कमाईत हातभार लावतो आणि या देशासाठी कर भरतो. आता विचार करा कोण कोणावरअवलंबून आहे?"