आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Double Murder: घरात सापडला फॅशन डिझायनर महिलेसह तिच्या नोकराचा मृतदेह, बुटिकमध्ये काम करणाऱ्या टेलरने दिली हत्येची कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथील वसंत कुंज परिसरात बुधवारी रात्री फॅशन डिझायनर माला लखानी (53) आणि तिचा नोकर बहादुर (50) या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना ग्रीन पार्क परिसरात माला लखानीच्या घरात दोघांचे मृतदेह सापडले. प्राथमिक चौकशीच्या आधारे पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. त्यापैकीच एक टेलरने आपणच हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून यासंदर्भात सविस्तर तपास केला जात आहे. 

 

बुटिकमध्ये टेलर होता मारेकरी
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही हत्या चाकूंनी भोसकून करण्यात आली आहे. त्यांचे मृतदेह घरातील टाइल्सवर सापडले आहेत. हे दुहेरी हत्याकांड बुधवारी रात्री करण्यात आले. पोलिस गुरुवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले तेव्हा सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांची कसून चौकशी केली. तेव्हा आरोपींपैकी एक टेलर राहुल अनवर याने हत्येची कबुली दिली.

- माला लखानी ग्रीन पार्कमध्येच आपले एक बुटिक चालवत होत्या. प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर घरात बळजबरी घुसलेले नव्हते. घराचे दार तोडल्याचे किंवा वस्तू फेकल्याची चिन्हे सापडली नाहीत. अर्थात हल्लेखोर परिचयाचे होते असा अंदाज पोलिसांनी लावला होता. यानंतर चौकशीत टेलर अनवरने आपला गुन्हा मान्य केला. तो मालाच्या बुटिकमध्ये काम करत होता. इतर दोघे अनवरचे नातेवाइक रहमत आणि वसीम होते. त्या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...