आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delhi: नोकरीसाठी आला होता फोन, दुस-या दिवशी नाल्‍यात सापडले दोन सख्‍ख्‍या बहिणींचे मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - अलीपूरमध्‍ये एका नाल्‍यात 23 सप्‍टेंबररोजी दोन तरूणींचे मृतदेह आढळून आले. स्‍थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह ताब्‍यात घेतल्‍यानंतर पोलिसांनी तपास केला असता एका मुलीच्‍या हातावर लकी हे नाव गोंदवलेले असल्‍याचे त्‍यांना आढळून आले. या टॅटूवरूनच अखेर तरूणींची ओळख पटवण्‍यात पोलिसांना यश आले आहे.


तपासामधून समोर आले आहे की, हे मृतदेह दोन सख्‍ख्‍या बहिणींचे असून त्‍या 22 सप्‍टेंबरपासून गायब होत्‍या. यातील मोठी बहिण रूक्‍साना 21 वर्षांची असून छोटी बहिण 19 वर्षांची आहे. तरूणींच्‍या आई शबनम यांनी माहिती दिली आहे की, त्‍या पती आणि दोन मुलींसह सीलमपुर परिसरात राहत आहे. पती ई-रिक्‍शा चालवतात.


शबनम यांनी सांगितले की, '19 सप्‍टेंबररोजी दोन्‍ही मुली घरातून हे सांगून बाहेर पडल्‍या की, नोकरीसाठी त्‍यांना आयएसबीटी बस अड्ड्यावर बोलावण्‍यात आले आहे. त्‍यांनतर संध्‍याकाळी 5 वाजता थोरल्‍या मुलीने फोन करून सांगितले की, ती एका कारमध्‍ये असून मॉडेल टाऊन येथे जात आहे. त्‍यानंतर दोघींचाही मोबाईल बंद झाला. रात्री उशीरापर्यंत मुली घरी न आल्‍याने आम्‍ही याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली.'


शबनम यांनी दिलेल्‍या माहितीनूसार, त्‍यांची मोठी मुलगी रूक्‍सानाने दोन वर्षांपूर्वीच एका गैरमुस्लिम युवकाशी लग्‍न केले. त्‍याचे नाव लकी होते. मात्र लग्‍नानंतर तो तिला प्रचंड त्रास देऊ लागला. ऐवढा की, त्‍याने रूक्‍सानाच्‍या मुलीलाही विकण्‍याचा प्रयत्‍न केला. या छळाला वैतागून रूक्‍साना आपल्‍या आईवडिलांच्‍या घरी परतली होती. तसेच तिने दुस-या विवाहाचीही तयारी सुरू केली होती. तरीही लकी तिचा पिच्‍छा सोडायला तयार नव्‍हता. शबनम यांनी सांगितले आहे की, 'तो नेहमी रूक्‍सानाला म्‍हणायचा की, तु माझी नाही तर कोणाचीची नाही.'

 

लकीनेच आपल्‍या दोन मुलींची हत्‍या केली आहे, असा आरोप शबनम यांनी केला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, दोन्‍ही मृतदेह पोस्‍टमार्टमसाठी पाठवण्‍यात आले आहे. त्‍याचा रिपोर्ट आल्‍यानंतरच मृत्‍यू कसा झाला, हे समजेल. त्‍यानूसार आम्‍ही पुढील तपास करू.'   

बातम्या आणखी आहेत...