आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी भाजप, आप आणि काँग्रेस बैठकांवर बैठका घेत आहेत. भाजप आणि काँग्रेसकडे अनुभवी नेत्यांची फौज आहे मात्र दोन्ही पक्षांत युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास इच्छुक आहेत. अशाच दोन्ही पक्षांत 12 पेक्षै अधिक नेते आपला राजकीय वारसा वाढवण्यासाठी मुलगा-मुलगी किंवा परिवारातील इतर सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा, माजी प्रदेशाध्यक्ष जेपी अग्रवाल यांनी मुलगी आणि मुलासाठी प्रयत्न करत आहेत. तर भाजपमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचा मुलगा व माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत मांगेराम गर्ग यांच्या मुलांनी तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
भाजप : विजेते आणि स्पष्ट प्रतिमा असल्यास उमेदवार कुटुंबातील सदस्यास तिकीट देऊ शकतात
भाजपात माजी सीएम मदनालाल खुराणाचे पुत्र हरिष खुराणा यांना मोतीनगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची चर्चा आहे. दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष मांगेराम गर्ग यांचे कुटुंब देखील मुलगा सतीष गर्गसाठी वजीरपूर येथून तिकीटाची मागणी करत आहेत. बल्लीमारान येथून माजी आमदार मोतीलाल सोढीचा परिवार सून लता सोढीसाठी त्याच जागेवर तिकीटाची मागणी करत आहेत. जगदीश मुखी जनकपुरी येथून निवडणूक लढवत आहेत तर मुलगा अतुल मुखासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. माजी आमदार ब्रह्मसिंह तंवर छतरपूर जागेसाठी मुलगा विकाससाठी तंवर जागेचे तिकीट मागत आहेत. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने भास्करला सांगितले की, घराणेशाहीला चालना देणार नाही परंतु एक विजयी आणि स्वच्छ प्रतिमा असल्याने त्यांचा पक्षात मोठा वाटा असलेल्या कुटूंबाशी संबंध आहे.
काँग्रेस :सुभाष चोप्रा यांच्यासह अनेक नेत्यांना कुटुंबासाठी तिकीट हवे आहे
मुलासाठी तिकीट मागणाऱ्यांच्या यादीत प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा आणि माजी प्रदेशाध्यक्ष जेपी अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे. आमदार राहिलेले हसन अहमद मुलगा अली मेंहदीसाठी तिकीटाची मागणी करत आहेत. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ.योगानंद शास्त्री मुलगी प्रियंका सिंहसाठी तिकीट मागत आहेत. माजी आमदार कंवर करण सिंह मुलगी आकांक्षा ओलासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. माजी खासदर सज्जन कुमार यांचा मुलगा जगप्रवेश आणि महाबल मिश्रा मुलगा विनय मिश्रासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. माजी आमदार मतीन अहमद, माजी खासदार परवेज हाशमी, सदर बाजारचे माजी आमदार राजेश जैन हे देखील सुरुवातीला मुलांसाठी तिकीटाची मागणी करत होते मात्र त्यांनी आता स्वतः रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे.
आप: संजय सिंह म्हणाले- पक्ष घटनेत दोन कुटुंबातील सदस्यांना तिकीट नाही
भास्करने आपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांच्याशी घराणेशाहीबद्दल बातचीत केली असता ते म्हणाले की, पक्षाच्या घटनेनुसार कुटुंबातील दोन लोकांना तिकीट देण्यास मनाई आहे. काँग्रेसमध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका वढेरा आहेत. भाजपामध्ये रमन, अभिषेक, अनुराग ठाकुर, वसुंधरा, दुष्यतं, राजनाथ, पंकज, कल्याण, राजवीर, प्रेमकुमार धूमिळ, आहेत. दोन्ही पक्षात हेच लोक आहेत. आप याच व्यवस्थेला बदलत आहे. आता जनता घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या पक्षांची झोप उडवण्यासाठी जागृत झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.