आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या व्हिडिओवरून आम आदमी पार्टी आणि भाजप समोरासमोर आले आहेत. यात आम आदमी पार्टीला आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करणे महागात पडले. या व्हिडिओमध्ये आवाज आपच्या प्रचाराच्या थीम साँगचा आहे. परंतु, त्यामध्ये भाजपचे खासदार मनोज तिवारी चक्क नाचताना दिसून आले आहेत. आपने हा व्हिडिओ शेअर करताना पाहा आमचे गाणे किती सुंदर आहे, की चक्क मनोज तिवारी सुद्धा त्यावर नाचत आहेत असे लिहिले. याच प्रकरणी भाजपने दिल्लीतील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. सोबतच दिल्ली निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार सुद्धा दाखल केली.
भोजपुरी गायक आणि अभिनेते असलेले मनोज तिवारी यांच्या इतर गाण्यातील डान्स क्रॉप करून या व्हिडिओमध्ये लावण्यात आला आहे. त्यापैकीच एक तिवारी यांच्या सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक 'रिंकिया के पापा..' यातील दृश्य सुद्धा दिसून येतात. आम आदमी पक्ष भाजपच्या लोकप्रियतेला घाबरले आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे कृत्य केले जात आहेत असेही तिवारी यांनी सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी हे थीम साँग जारी केले होते. हे गाणे संगीतकार विशाल ददलानी यांनीच गायले आणि बनवले आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत विशाल ददलानी यांनीच '5 साल केजरीवाल' हे थीम साँग तयार केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.