आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election 2020: Deputy Chief Minister Manish Sisodia's OSD Arrested, CBI Rs 2 Lakh Caught Red Handed Taking Bribe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीच्या उप-मुख्यमंत्री कार्यालयातील बड्या अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी सीबीआयने दिल्ली सरकारच्या बड्या अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक केली. या अधिकाऱ्याचे नाव गोपाल कृष्ण माधव असून ते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) पदावर कार्यरत होते. त्यांनी 2 लाख रुपयांची लाच घेतली होती असा आरोप करण्यात आला आहे. गोपाल सध्या सीबीआयच्या मुख्यालयात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सोबतच, या प्रकरणात मनीष सिसोदिया यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

2015 सिसोदिया यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आरोपी सध्या जीएसटी गोळा करण्याची जबाबदारी सांभाळत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जीएसटीचे एक प्रकरण मिटवण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, आम्ही सीबीआयच्या कारवाई आणि टायमिंगवर कुठलाही प्रश्न उपस्थित करत नाही. जो कुणी लाच घेत असेल त्याला तत्काळ अटक करायला हवी. भ्रष्टाचाराच्या विरोधात आमच्या सरकारने कठोर भूमिका घेतलेली आहे.

11 तारखेला होणार दिल्लीचा फैसला...

दिल्लीच्या 70 विधानसभा जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. यासाठी सर्वच तयारी पूर्ण झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा गुरुवारीच थंडावल्या. आता भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार मतदारांच्या घरो-घरी जाऊन छुप्या मोहिमा राबवत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल 11 फेब्रुवारी रोजी घोषित केले जाणार आहेत.