आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election 2020: Kejriawal Takes A Dig At Vinod Tawade On His Delhi Tour For Bjp Rally

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्यांनी महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद केल्या, ते दिल्लीत प्रचार करायला येत आहेत!

एका वर्षापूर्वीलेखक: मो. इकबाल
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या प्रचारासाठी दिल्लीत गेलेले माजी शिक्षणमंत्री तावडेंना केजरीवालांकडून शालजोडे
  • त्यांना इथल्या शाळा दाखवा, छोले भटुरे खाऊ घाला; ते आपले पाहुणे आहेत -केजरीवाल

नवी दिल्ली - ज्यांनी महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद केल्या, तेच आज दिल्लीत प्रचारासाठी येत आहेत अशा शब्दांत केजरीवालांनी विनोद तावडे यांना शालजोडे मारले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते भाजपचा प्रचार करण्यासाठी सभा घेत आहेत. त्यांनाच चिमटा घेताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्याच शैलीत सुनावले. केजरीवाल यांनी बुधवारी केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विट करताना केजरीवाल म्हणाले, "विनोद तावडे जी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी शिक्षणमंत्री असताना महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद पाडल्या. आता हेच दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. माझ्या दिल्लीकरांनो, आपण खूप मेहनत घेऊन सरकारी शाळांमध्ये अभूतपूर्व बदल घडवले आहेत. त्यांना दिल्लीच्या सरकारी शाळा दाखवा, छोले भटुरे खाऊ घाला आणि दिल्ली दर्शन करून द्या. ते आपले पाहुणे आहेत."