आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election 2020 : Kejriwal Did Road Show In Delhi, Cashback Scheme Of Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत केजरीवालांनी केला रोड शो, काँग्रेसची कॅशबॅक योजना जाहीर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी रविवारी प्रचार मोहिमेला वेग दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रोड शो केला तर गृहमंत्री अमित शहा यांनी महा जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली. तर काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध झाला. केजरीवाल रोड शो दरम्यान ज्या ठिकाणी गेेले त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी चांगले गेले पाच वर्षे अशी घोषणा दिली. केजरीवाल यांनी रोड शो आधी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात म्हटले की, माझ्या दिल्लीकरांनो, तुमचा मुलगा दहशतवादी नाही. ८ फेब्रुवारी रोजी भाजपवाल्यांना उत्तर द्या. भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी एका रॅलीत म्हटले होते की, दिल्लीत केजरीवाल सारखा दहशतवादी आहे.दरम्यान, काँग्रेसने या निवडणुकीसाठी रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित करण्यात आला. काँग्रेसने मतदारांना स्वस्त जेवणाचे आश्वासन दिले आहे. तसेच, लोकपाल, रोजगार निर्मिती, पर्यावरण संरक्षण, वीज आणि पाणी पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ज्येष्ठांसाठी निवृत्तिवेतनात वाढ, सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता, पाणी वाचवा आणि पैसे कमवा, तसेच वीज वाचवा व पैसे कमवा अशा अाकर्षक घोषणा केल्या आहेत. काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा, पक्षाचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा, अजय माकन यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. युवकांसाठी शंभर दिवसांचा कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीकरांना २० लिटर पाणी मोफत देण्यात येईल. पाणी बचत केल्यास प्रत्येक लिटर पाण्याला ३० पैसे देण्यात येणार आहेत. तसेच, वीज वाचवणाऱ्यांना प्रत्येक युनिटमागे तीन रुपये देण्यात येणार आहेत. तीनचाकी रिक्षांचे उर्वरित कर्ज माफ करणे, प्रत्येकाला मोफत आराेग्य सेवा आणि मोफत औषधी देण्यात येणार आहे.पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राजकीय पंडितांना चकित करत न भुतो न भविष्य असा विजय मिळवणाऱ्या आपल्याला यावेळी सत्तेतून बेदखल करण्याच्या इराद्याने भारतीय जनता पक्षाने चांगलाच जोर लावला आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भाजप या निवडणुकीत काळजीपूर्वक पावले टाकताना दिसत आहे. मित्र पक्षांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून सहकारी पक्षांना सोबत घेतले आहे.