आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लाचार मुख्यमंत्री म्हटले आहे. केजरीवाल यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्यांवर अद्याप ठाम भूमिका घेतलेली नाही. एवढेच नव्हे, तर दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. त्या विद्यार्थ्यांवर हल्ले होत असताना एक मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल काहीच करू शकले नाही असा थेट आरोप शशी थरुर यांनी केला आहे.
वृत्तसंस्थेशी संवाद साधताना थरुर म्हणाले, "केजरीवाल यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध आणि समर्थन हे दोन्ही आपल्याच बाजूने ठेवायच्या असतील. त्यामुळेच त्यांनी या मुद्द्यावर अद्याप आपली नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली नाही." ते दिल्लीतील विद्यार्थ्यांना संरक्षण देऊ शकत नाहीत. अशात दिल्लीच्या जनतेने त्यांना कशाला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून द्यावे आणि आम आदमी पक्षाला मतदान का करावे असा सवाल थरुर यांनी केला.
गेल्या रविवारी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घुसलेल्या नकाबधारी गुंडांनी तेथील विद्यार्थ्यांना रॉड आणि काठ्यांना मारहाण केली. यामध्ये 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान, या मुद्द्यावर केजरीवाल यांनी आधीच स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, दिल्ली पोलिस राज्य सरकारचे नव्हे तर केंद्र सरकारच्या आदेशांवर काम करते. परंतु, तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणून अशा स्वरुपाच्या हिंसाचारावर बोलू देखील शकत नाही का असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी विचारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.