आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Election 2020 : Prabhat Pheri To Turn Out To Increase Voting, Will Reverberate On The Streets

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निघणार प्रभात फेरी, शाळेतील विद्यार्थी करणार मतदार जनजागृती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी निवडणूक कार्यालयाकडून विविध अभियान राबिवले जात आहे. या अभियानांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. ही मुले 17 जानेवारी रोजी आपल्या शालेय परिसरात लोकांमध्ये जागरुकता करताना दिसणार आहेत. 
मतदारांना जागरूक करण्यासाठी, निवडणूक आयोगाने एमसीडीच्या शिक्षण विभागाला पत्र पाठविले आहे व त्यांनी मुलांच्या सहभागासह प्रभात रॅली काढण्यास सांगितले आहे. प्रभात रॅलीत एमसीडी शाळांतील चौथी-पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ही रॅली एमसीडी शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे सकाळी 9-10 वाजेदरम्यान काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी निवडणूक कार्यालयाकडून झेंडे आणि बॅनर देण्यात येणार आहेत. या रॅली शाळेतील आसपासच्या भागांत काढण्यात येणार आहे. 


दिल्लीकरांनो मतदान करा, कमी मतदान झालेल्या क्षेत्रात एकत्र मोहीम सु
रू  


दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.रणबीर सिंह व पूर्व दिल्लीचे जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण कुमार मिश्रा यांनी शनिवारी लोकसभा निवडणूक 2014 मध्ये कमी मतदान झालेल्या 30 विधानसभांसाठी एकत्र विशेष जागरुकता अभियानाची सुरुवात केली. मोहिमेची कॅच लाईन - दिल्लीचे दबंग मतदान करा सोबत नाटक संघाने 8 फेब्रुवारीच्या निवडणुकीत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. विकासपुरी, मतियाळा, ओखला, बदरपूर, बुराडी, बवाना, नांगलोई जट, मुडका, रिठाला. किराडी, करावल नगर, उत्तम नगर, नरेला, नजफगड, देवली, पालम, बादली, पटपडगंज, मुस्तफाबाद, महरौली, द्वारका, घोंडा, लक्ष्मी नगर, छतरपूर, कालकाजी, बाबरपूर, पटेल नगर, तिमारपूर, राजेंद्र नगर आणि बिजवासन विधानसभांमध्ये कमी मतदान झाले होते.  1950 वर मिळले सर्व माहिती


जागरुकता अभियानाच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी नगर विधानसभाच्या मंडावली आणि व्ही थ्री एस मॉलमध्ये मतदारांचा सहभाग, ईव्हीएम जागरुकतावर पथनाट्य करण्यात आले. येथील लोकांना निवडणूक जागरुकतते थांबवून एक प्रश्नोत्तरी सत्र आयोजिक करण्यात आले होते. ज्यामध्ये निवडणुकीशी संबंधित प्रश्नोत्तरे घेण्यात आली. मतदार हेल्पलाईन नंबर 1950 वर सर्व मदत घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...