आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election 2020: Union Minister Prakash Javadekar Says, Kejriwal Is A Terrorist AAP Reacts News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरविंद केजरीवाल म्हणजे दहशतवादी! केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे वादग्रस्त विधान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करताना केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की दिल्लीचे मुख्यमंत्री एक दहशतवादी आहेत. ते लोकांना निरागस चेहरा करून विचारतात, मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात ते दहशतवादीच आहेत असे जावडेकर म्हणाले आहेत. जावडेकरांच्या या विधानावर आम आदमी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री जावडेकर सोमवारी बोलताना म्हणाले, "केजरीवाल अतिशय निरागस चेहरा घेऊन लोकांमध्ये जातात आणि विचारतात, की मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात केजरीवाल दहशतवादीच आहेत. त्यांनी स्वतः म्हटले होते की ते अराजकतावादी आहेत. अराजकतावादी आणि दहशतवादी यात जास्त काहीच फरक नाही. दोघेही सारखेच असतात."

...तर केजरीवालांना अटक करूनच दाखवा -आप
 
केंद्रीय मंत्र्याने एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला दहशतवादी म्हणण्याचा आम आदमी पक्षाने तीव्र निषेध केला आहे. आपचे खासदार संजय सिंह म्हणाले, "ज्या दिल्लीत केंद्र सरकार विराजमान आहे, ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे मुख्यालय आहे, त्याच ठिकाणी हे सर्व काही घडत आहे. एक केंद्रीय मंत्री अशा भाषा वापरू शकतो का? अरविंद केजरीवाल खरंच दहशतवादी असतील तर तर मी भाजपला आव्हान देतो की त्यांनी केजरीवाल यांना अटक करून दाखवावे."