आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Election Date 2020: Delhi Assembly Election Will Be Held On 8th February And Declaration Of Result On 11th February

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, येत्या 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 ला निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2015 मध्ये आपने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळाला होता

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत, तर 11 तारखेला निकाल लावले जातील. यासोबतच दिल्लीत आचार संहिता लागू झाली आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागांवर विजय मिळाला होता तर भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला त्यावेळेस खातेही उघडता आले नव्हते. 

काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त ?

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, विद्यमान विधानसभेचा कार्यकाळा 22 जानेवारी 2020 ला संपत आहे. 70 विधानसभा जागांसाठी निवडणुकी होतील. दिल्लीत 1 कोटी 46 लाख 92 हजार 136 मतदार आहेत. दिल्लीत 2689 ठिकाणी मतदान पार पडेल. 13 हजार 757 पोलिंग बूथ असतील. निवडणुकीत 90 हजार कर्मचाऱ्यांची गरज भासेल. 

दिल्ली विधानसभा निवडणूक 2015 चे निकाल

पक्षजिंकलेल्या जागावोट शेअर
आप6754.30%
भाजप332.10%
काँग्रेस09.60%

एकूण मतदार : 89,36,159 (67.1%)