Home | Sports | From The Field | Delhi enters in playoffs after seven years

दिल्ली सात वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये; नऊ वर्षांनंतर हाेमग्राउंडवर बंगळुरूला नमवले

वृत्तसंस्था | Update - Apr 29, 2019, 10:24 AM IST

दिल्लीची बंगळुरूवर १६ धावांनी मात; आठव्या विजयाची नाेंद

  • Delhi enters in playoffs after seven years

    दिल्ली - सामनावीर शिखर धवन (५०) आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (५२) झंझावाती खेळीच्या बळावर यजमान दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलमध्ये आठव्या विजयाची नाेंद केली. यजमान संघाने रविवारी लीगमधील आपल्या १२ व्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावला. दिल्लीने १६ धावांनी सामना जिंकला. यासह दिल्लीचा संघ यंदा लीगच्या प्लेआॅफमध्ये दाखल झाला आहे.अशा प्रकारे प्ले आॅफमधील आपले स्थान निश्चित करणारा दिल्ली हा चेन्नईनंतर दुसरा संघ ठरला. दिल्लीच्या टीमला तब्बल सात वर्षांनंतर हा पल्ला यशस्वीपणे गाठता आला आहे. तसेच विजयासह दिल्लीने अव्वल स्थान गाठले आहे.


    यजमान दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून बंगळुरू टीमसमाेर विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. पार्थिव पटेल (३९), काेहली (२३), स्टाेइनिस (नाबाद ३२) यांनी केलेला प्रयत्न अपयशी ठरला.

Trending