आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Factory Fire Department On Delhi Anaj Mandi Fire Accident Rani Jhansi Area Today Latest News

अनाज मंडीमधील ज्या इमारतीला भीषण आग लागली, एका दिवसापूर्वी त्या इमारतीच्या मागच्या फॅक्टरीमध्येही आग लागली होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कूल बॅग बनवणाऱ्या फॅक्टरीला लागलेल्या आगीत 44 जणांचा मृत्यू झाला

नवी दिल्ली- दिल्लीमधील अनाज मंडी परिसरात असलेल्या एका फॅक्टरीला लागलेल्या आगीत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन विभागाने सांगितल्यानुसार आग लागलेल्या परिसरात खूप लहान बोळी असल्यामुळे आग विझविण्यास उशीर झाला. यातच आता, एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ज्या फॅक्टीरमध्ये आग लागली, त्याच्या मागील फॅक्टरीमध्ये काल आग लागली होती. यात कोणतीही हानी झाली नव्हती.विभागाचे चीफ फायर ऑफिसर अतुल गर्ग यांनी सांगितल्यानुसार, त्यांना सकाळी 5:20 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. पण, आग फॅक्टरीमध्ये लागली आहे आणि त्यात लोक अडकले आहे, अशी माहिती मिळाली नाही. लहान गल्ल्या असल्यामुळे गाड्यांना आतमध्ये जाता आले नाही. त्यामुळे 100 मीटर दूरवरुन पाणी टाकण्याचे काम करण्यात आले.