आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये स्कुल बॅग बनवणाऱ्या फॅक्ट्रीत भीषण आग, 43 जणांचा मृत्यू, 50 लोकांना सुखरूप बाहेर काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : राणी झांसी रोड भागातील अनाज मंडी स्थित फॅक्ट्रीमध्ये रविवारी सकाळी आग लागली असून यामध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बहुतांश लोक धुरामुळे प्रभावित झाले आहेत. आग सकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी लागली.  

फॅक्ट्रीमध्ये 12-15 मशीन लावलेल्या होत्या - स्थानिक व्यक्ती
एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, माझे 2 पुतणे फॅक्ट्रीमध्ये काम करत होते. त्यांची कोणतीच माहिती अजूनही मिळालेली नाही. येथे 12-15 मशीन लावलेल्या होत्या. चीफ ऑफिसर सुनील चौधरी यांनी सांगितले की, आग 600 स्क्वेअरफूटच्या प्लॉटमध्ये लागली असून ही एक फॅक्ट्री आहे. येथे स्कुल बॅग, बॉटल आणि इतर इतर सामान ठेवण्यात आले होते.
 

बातम्या आणखी आहेत...