आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैया कुमार खटल्यासाठी परवानगी देण्यास दिल्ली सरकारने उशीर करू नये 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अायाेजित कार्यक्रमासंदर्भात विद्यार्थी नेता कन्हैया कुमारविरोधात देशद्राेहाचा खटला दाखल केला अाहे. हा खटला चालवण्यासाठी दिल्ली सरकारकडून परवानगी मिळणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या वेळी दिल्ली सरकारने परवानगी देण्यास उशीर करू नये. २८ फेब्रुवारीपर्यंत परवानगी द्यावी, असे अादेश देत पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी राेजी ठेवली. 

 

देशद्रोह प्रकरणात कन्हैया कुमार यांच्यावर खटला दाखल अाहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, अाराेपीविराेधात खटला चालवण्यासाठी पाठवलेली फाइल दिल्ली सरकारकडे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित अाहे. काही दिवसांत याला परवानगी मिळू शकते. यावर न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर खटला चालवण्यास परवानगी द्यावी. विशिष्ट कालावधीपेक्षा जास्त दिवस अधिकारी परवानगी घेण्यासाठी घेऊ शकत नाहीत. पोलिसांनी २८ फेब्रुवारीपर्यंत परवानगी घ्यावी, असे अादेश मुख्य न्यायदंडाधिकारी दीपक शेरावत दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी राेजी ठेवली. 

 

दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी अाराेपपत्र दाखल करताना संबंधित अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली नव्हती. त्यावर न्यायालयाने मंजुरी नसताना अाराेपपत्र का दाखल केले? असा प्रश्न उपस्थित केला हाेता. तुमच्याकडे कायदेशीर विभागसुद्धा नाही. त्यानंतर पोलिसांनी १० दिवसांत मंजुरी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयात सांगितले हाेते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी ६ फेब्रुवारी राेजी ठेवण्यात अाली हाेती. त्यावर अाज सुनावणी झाली. परंतु दिल्ली सरकारची मंजुरी नसल्याने न्यायालयाने पुढील तारीख दिली. दरम्यान, कन्हैया कुमार व उमर खालीद यांनी निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून राजकीय हेतूने अाराेपपत्र दाखल करण्यात अाल्याचा अाराेप केला अाहे. 

 

काय अाहे प्रकरण 
संसदेवर हल्ला प्रकरणातील मास्टर माइंड अफझल गुरूला फाशी दिल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयू परिसरात कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या कार्यक्रमात देशद्रोही घाेषणा देण्यात अाल्याचा अाराेप अाहे. दरम्यान, यासंदर्भातील व्हिडिअाे क्लिप, वृत्तवाहिन्यांवर अालेले फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते. हे व्हिडिअाे तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवण्यात अाले. त्यातील अहवालात व्हिडिअाे खरे असल्याचे म्हटले असल्याचा दावा पोलिसांनी केला. 

 

१४ जानेवारी राेजी दाखल केले हाेते अाराेपपत्र 
दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी १४ जानेवारी राेजी कन्हैया कुमार, उमर खालीद, अनिर्बान भट्टाचार्य व अन्य सात काश्मिरी विद्यार्थ्यांवर अाराेपपत्र दाखल केले हाेते. देशद्रोह, खाेटी कागदपत्रे तयार करणे, बेकायदेशीर पद्धतीने एकत्र येणे, दंगे करणे, कट रचणे यासंदर्भातील कलमे लावून अाराेपपत्र दाखल केले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...