आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Has Been Recreated In Banaras For Ayushman Khurana's Film 'Shubh Mangal Jyada Savdhan'

आयुष्मान खुरानाचा चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' साठी बनारसमध्ये रीक्रिएट केली दिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आयुष्मान खुराणा सध्या काशीमध्ये आपल्या आगामी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. समलैंगिक प्रेमकथेवर आधारित या चित्रपटासाठी निर्मात्यांनी काशीतच दिल्लीतील मोहल्ला मोहब्बत वाला सेट उभारला आहे. खरं तर टीमचा दिल्लीला येण्या-जाण्याचा, राहण्याचा खर्च वाचावा म्हणून काशीतच हुबेहूब सेट उभारून तेथेच शूटिंग सुरू केली आहे. आयुष्मान येथे पुढचे ५६ दिवस २०० लोकांसोबत शूटिंग करणार.

56 दिवसांचे आहे शेड्यूल
200 लोकांची टीम आहे सोबत
14 फेब्रुवारी रोजी रिलीज होईल हा चित्रपट

खर्च वाचवण्यासाठी
बरेच निर्माते अापला खर्च वाचवण्यासाठी हा प्रयोग करतात. उदा 'इंदू सरकार'च्या निर्मात्यांनीदेखील दिल्लीचा ८० टक्क्यांपेक्षा जास्त भाग मुंबईपासून दूर कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये उभारला होता.

सेटवरील उपस्थित एका सूत्राने सांगितले...
पूर्ण चित्रपटाचे शूटिंग काशीतच केले जाणार आहे. मात्र यातील पात्रांचा प्रवास काही दिल्लीत दाखवला जाणार आहे. दिल्लीतीत कोणत्या भागात ते राहतात ते अजून सांगण्यात आले नाही. दिल्लीतील कॉलनीमध्ये ज्या प्रकारचे रस्ते आणि दुभाजक असतात, आम्हाला तसेच दाखवायचे होते. फक्त एवढ्यासाठी पूर्ण टीमला आपले सर्व सामान घेऊन दिल्लीला जायला परवडले नसते. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मिती आणि कला विभागाने ही समस्या सोडवली. त्यांनी काशीतच एका वस्तीत तसे रस्ते, घर आणि दुभाजकांना रंगवून तयार केले. दिल्लीतील हुबेहूब एक वस्ती काशीच्या केंद्राचल कॉलनीत उभारण्यात आली आहे.

याची होईल शूटिंग
चित्रपटात दिल्लीतील या कॉलनीतील रस्ता आणि दुभाजक दाखवण्यात येईल. या रस्त्याच्या दोन्हीकडे क्वार्टर्स बनलेले आहेत येथेच कलाकार राहतात. कॉलनीमध्ये स्वच्छ रस्ता दाखवण्यात येईल, त्यात पिवळ्या रंगाचे दुभाजक जसे दिल्लीत आहेत रस्त्यावर गाडी चालवताना दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटासाठीदेखील उभारण्यात आले होते सेट
काशीमध्ये दिल्ली किंवा इतर कोणत्याही शहराचा सेट उभा करण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी असे झाले आहे...
- 'सुपर 30' साठी पटनामध्ये बिहारचा सेट उभारण्यात आला होता.
- यापूर्वी 'गँग्स ऑफ वासेपुर'साठी झारखंडचे धनबाद काशीत उभारण्यात आले होते. मिर्झापूरमध्ये मोठमोठे भाग शूट करण्यात आले होते. वासेपुरच्या कत्तलखान्याचे शूट अलाहाबादच्या कत्तलखान्यात शूट झाले होते.

ही उदाहरणेदेखील आहेत
- प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटांसाठी मध्यप्रदेशात बिहारचा सेट उभारण्यात आला होता.
- साहोसाठी हैदराबादमधील रामोजी स्टुडिओत मुंबईतील वरळी सी लिंकचा सेट उभारला.