आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi High Court Bans Chhapaak| Stops Screening From 15 January| Directed To Give Credit To Lawyer

15 जानेवारीपासून चित्रपटाच्या रिलीजवर बंदी, दिल्ली उच्च न्यायालयाने दिले वकील अपर्णा भट्ट यांना क्रेडिट देण्याचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'छपाक' रिलीज झाला आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वकील अपर्णा भट्ट यांना क्रेडिट न दिल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा चित्रपट 15 जानेवारीपासून मल्टिप्लेक्स, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणि 17 जानेवारीपासून इतर कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित होऊ शकणार नाही. यापूर्वी, पटियाळा हाऊस कोर्टाने निर्मात्यांना वकील अपर्णा भट्ट यांना क्रेडिट देण्याचे आदेश दिले होते.

फिल्ममेकिंग कंपनी फॉक्स स्टुडिओने ट्रायल कोर्टाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय राखून ठेवला आणि मेघना गुलजार यांना अपर्णा भट्ट यांना क्रेडिट देण्याचे आदेश दिले. दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टाने मेकर्सना, 'अपर्णा भट्ट महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराविरोधात लढा देत आहेत'  ही ओळ समाविष्ट करण्याचा आदेश दिला होता.


शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान चित्रपट निर्मात्यांनी कोर्टापुढे युक्तिवाद केला की भट्ट यांना या चित्रपटात दिलेल्या योगदानाचे कोणत्याही स्वरूपात श्रेय घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. स्टुडिओने हायकोर्टाकडे ट्रायल कोर्टाचा आदेश काढून टाकण्याची विनंती केली होती. स्टुडिओच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात रिलीजच्या एक दिवस आधी जर आदेश जारी केला तर याचिकाकर्त्यासोबत ते अन्यायकारक असेल.

काय म्हणाल्या होत्या अपर्णा भट्ट... 
छपाकच्या विरोधात वकील अपर्णा भट्ट यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत एक याचिका दाखल केली हाेती. याचिकेत म्हटले होते की, अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी हिचा खटला गेल्या काही वर्षांपासून लढला. मात्र तरीही निर्मात्यांनी मला कोणतेही क्रेडिट दिलेले नाही. त्याचमुळे आता चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी यावी, अशी मागणी केली होती. यावर आता कोर्टाने निर्णय देत असे म्हटले की, निर्मात्यांनी लक्ष्मी यांच्या वकिलांना चित्रपटात क्रेडिट द्यावे.