Home | National | Delhi | Delhi Karol Bag Hotel Arpit Palace Fire

दिल्ली : हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून 3 लोकांनी मारली उडी

नॅशनल डेस्क | Update - Feb 12, 2019, 12:26 PM IST

आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तीन लोकांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

 • Delhi Karol Bag Hotel Arpit Palace Fire

  नवी दिल्ली - करोलबाग येथील गुरुद्वारा रॉड स्थित हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजता लागलेल्या आगीमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश लोकांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तीन लोकांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये एकाच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत.

  मृतांमध्ये 3 महिला, एक मुलगा
  दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींना राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि तीन महिलांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या लाकडांच्या पॅनलमुळे आग जास्त पसरत गेली.

  एकाच कुटुंबाने बुक केल्या होत्या 35 रूम
  सांगण्यात येत आहे की, येथीलच एका कुटुंबाने 35 रूमची बुकिंग केली होती. शहरातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण आले होते. या घटनेत 35 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग लागण्यामागेचे कारण अजून स्पष्ट नाही.

Trending