आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Man Claims To Be Transitioning Into A Woman, Seeks Quashing Of Molestation Case; HC Dismisses Plea

जज साहेब, मी स्वतः लिंग परिवर्तन करून महिला होतोय, अश्लील वर्तनाचा खटला रद्दा करा!

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोर्टात महिलांचे कपडे, केशरचना आणि मेक-अपमध्येच लावली हजेरी
  • म्हणाला- त्या घटनेचा इतका पश्चाताप की मीच आता महिला होणार

नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टात छेडछाडीचा खटला रद्द करण्यासाठी एका आरोपी पुरुषाने अजब दावा केला आहे. महिलांचा मी खूप आदर करतो, त्यांना छेडण्याचा मी विचारही करणार नाही. त्यातच मी स्वतः सेक्स चेंज करून महिला होत आहे. त्यामुळे, माझ्याविरुद्ध सुरू असलेली गुन्हेगारी शिक्षेची प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी विनंती त्याने केली. एकाच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलेने त्याच्याविरुद्ध अश्लील वर्तनाचे आरोप लावले होते. तेव्हापासून आपल्याला किती पश्चाताप होतोय हे त्याने कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला.

कोर्टात महिलांचे कपडे, केशरचना आणि मेक-अपमध्ये लावली हजेरी

आरोपीने कोर्टाला सांगितल्याप्रमाणे, ती घटना घडली तेव्हापासूनच त्याला खूप पश्चाताप होत आहे. पुरुष असतानाही महिला होण्याची इच्छा होत आहे. कागदपत्रांमध्ये त्याने आपल्या परिस्थितीला 'जेंडर डायस्फोरिया' असे म्हटले आहे. यामध्ये एखाद्या पुरुष किंवा महिलेला आहे त्या लिंगाबद्दल घृणा निर्माण होते. आपले लिंग परिवर्तन करण्याची तीव्र इच्छा होते. कोर्टात हजेरी लावताना आरोपीने महिलांचे पारंपारिक कपडे, केशरचना आणि मेक-अप लावला होता. एकदाचा महिला म्हणून लिंग परिवर्तन केल्यास आपल्यावर आरोप करणारी महिला आणि आपण 'दोन बहिणी' होऊ असे तो कोर्टाला म्हणाला आहे.

2016 मध्ये केले होते अश्लील वर्तन

ऑक्टोबर 2016 मध्ये आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, पीडित महिला आणि आरोपी (33) नोएडातील एकाच कंपनीमध्ये काम करत होते. 2014 मध्ये आरोपीने दिल्लीच्या कनॉट प्लेस येथील एका पबमध्ये संबंधित महिलेसोबत अश्लील वर्तन केले होते. तिने यासंदर्भात कंपनीकडे वेळोवेळी तक्रार केली. परंतु, तिची दखल घेण्यात आली नाही. उलट, कालांतराने पुरुषाच्या बाजूने निकाल दिला. यानंतरच तिने पोलिसांची मदत घेतली. स्थानिक न्यायालयाने ऑगस्टमध्ये आरोपीला निर्दोष ठरवले. यानंतर तिने हायकोर्टात धाव घेतली. पीडित महिला सध्या नसांच्या आजारामुळे चालू शकत नाही. कोर्टात तिने व्हीलचेअरवर हजेरी लावली होती. तिने आपल्या बहीण आणि वकिलांच्या मदतीने आपली भूमिका मांडली. तसेच आरोपीला माफ करण्यास नकार दिला. यानंतर हायकोर्टाने आरोपीची याचिका फेटाळून लावली.