आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Man Tries To Take Obscene Photos Of 18 Year Old Girl

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाथरूममध्ये अंघोळ करत होती तरुणी, तेवढ्यात शेजारच्या बाल्कनीतून आत डोकावताना 'तो' दिसला, मग तरुणीने जे केले, त्यामुळे समोर आली पूर्ण कहाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत एका 42 वर्षीय व्यक्तीला 18 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी आपल्या बाल्कनीतून तरुणीच्या बाथरूममध्ये डोकावून तिचे आक्षेपार्ह फोटोज काढण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर तरुणीने आपल्या पालकांसोबत जाऊन आरोपीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली.

 

बाथरूममध्ये डोकावत होता आरोपी
- ही घटना शक्करपूर परिसरातील आहे. येथे तरुणी बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेवढ्यात तिची नजर जवळच्याच बाल्कनीतून बाथरूममध्ये डोकावत जाणाऱ्या व्यक्तीवर पडली.
- तरुणीने पाहिले की, तो व्यक्ती तिचे आक्षेपार्ह फोटोज काढण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहताच तरुणी बाथरूममधून किंचाळतच बाहेर आली आणि तिने आरोपीवर बादली फेकून मारली.
- या घटनेनंतर आरोपी भीतीमुळे घरात जाऊन लपला. यानंतर तरुणीने आपल्या पालकांसोबत आरोपीचे घर गाठले, तेथे तो स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होता.

 

पूर्वीही केला होता छेडछाडीचा प्रयत्न
- दिल्ली ईस्टचे डीसीपी पंकज सिंह म्हणाले की, आरोपीविरुद्ध केस रजिस्टर्ड केली आहे. आरोपीने याआधीही अनेकदा पीडितेला छेडण्याचा आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे.
- पोलिस म्हणाले की, आरोपी टेक्निशियन म्हणून एका प्रतिष्ठित हिन्दी दैनिकात काम करतो. आरोपीची आणखी चौकशी सुरू आहे.