आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi : Missing Posters Of BJP MP And Former Cricketer Gautam Gambhir Seen In ITO Area

खासदार हरवले आहेत... खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतमवर दिल्लीकरांची गंभीर टीका  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासरा गौतम गंभीर याच्या विरोधात आमचा खासदार हरवला आहे अशी आशयाचे पोस्टर रविवारी दिल्लीत जागोजागी लागले आहेत. दिल्लीत वाढत्या प्रदूषणाबाबत बोलावण्यात आलेल्या बैठकीला हजेरी न लावल्यामुळे गौतमला नागिरकांच्या गंभीर टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पोस्टर्सवर 'आपण यांना पाहिलंत का? अखेरच्या वेळी इंदूरमध्ये जिलबी खाता दिसले होते. संपूर्ण दिल्ली यांना शोधत आहे.' असा काहीसा मजकूर लिहिलेला आहे.  गंभीर मागील आठवड्यात इंदूरमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या समलोचनासाठी आले होते. शुक्रवारी व्ही.व्ही.एस लक्ष्मणने जतिन सप्रू आणि गंभीरसोबत पोहे आणि जलेबी खातानाचा एक फोटो ट्वीट केला होता. यानंतर युझर्सनी गंभीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी गौतम गंभीरवर टीकास्त्र सोडले होते. मला शिवीगाळ करू प्रदूषण कमी होणार असेल तर मनापासून शिवीगाळ करा - गंभीर

हा वाद वाढल्यानंतर गंभीरने ट्वीट केले की, मला शिवीगाळ केल्यास दिल्लीचे प्रदूषण कमी होणार असेल तर तुम्ही मला मनभरून शिवीगाळ करा. माझा संसदीय मतदारसंघ आणि शहराशी असलेली बांधिलकी तेथील होणाऱ्या कामांवरून ठरवायला हवी. गेल्या 6 महिन्यांत मी माझ्या मतदारांना सर्वोत्तम देण्यास कसलीही कसरही सोडली नाही. यावेळी गंभीरने आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध कामांचा आढावा ट्विटरवर शेअर केला होता.

प्रदूषणाबाबत होणारी बैठकील लावली गैरहजेरी


दिल्लीत दिवाळीनंतर प्रदूषणाच्या पातळीत बराच वाढला आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारला यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदूषणाच्या मुद्द्यावर 15 नोव्हेंबर रोजी सरकार, अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक होणार होती.  बैठकीच्या पॅनलमध्ये गौतम गंभीरसह 29 सदस्यांना बोलावण्यात आले होते. मात्र फक्त चारच सदस्या या बैठकीसाठी पोहोचले. दिल्लीच्या तीन महानगरपालिकांचे आयुक्तांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली. यावर ही गैरहजेरी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान असल्याचे आपने सांगितले.