सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी / सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी CBI मुख्यालयात श्रीश्रींचे वर्कशॉप; प्रशांत भूषण म्हणाले, आता मांत्रिक, ज्योतीष आणि गारूडीही येतील...

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 03:49:00 PM IST

नवी दिल्ली- देशाची प्रमुख तपास संस्एथा सीबीआई मध्ये वादाचे सत्र सुरुच आहे. त्यात आता सीबीआय मुख्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीश्री रवीशंकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ही कार्यशाळा तीन दिवसांची आहे. सीबीआयने आधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि क्षमता वाढवी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत सीबीआईचे 150 आधिकारी सहभागी होणार आहेत.

चांगल्या वातावरणासाठी कार्यशाळा -सीबीआय

या कार्यशाळेचे आयोजन 'सिनर्जी प्रोग्राम' अंतर्गत होत आहे. यामुळे आधिकाऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढेल, त्यांच्यात ताळमेळ वाढेल आणि चांगल्या वातावरणाची निर्मिती होईल, असे सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले.

प्रशांत भूषण म्हणाले- आता मांत्रिक आणि गारूडीही येतील
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. संचालक पदावरून आलोक वर्मा यांची हकालपट्टी करून नागेश्वर राव यांना नियुक्त केल्यानंतर सीबीआय श्रीश्री यांच्या कार्यशाळेचे आयोजन करत आहे. सीबीआयमधून नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे असे म्हटले जात आहे. आता लवकरच येथे मांत्रिक, ज्योतिषी आणि गारूडीही येतील.

X
COMMENT