आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीदरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुख 8 दिवसानंतर पोलिसांच्या ताब्यात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 फेब्रुवारीला दिल्लीतील जाफराबादमध्ये शाहरुखने 8 राउंड फायर केले होते

बरेली(उत्तरप्रदेश)- उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान गोळीबार करणारा आरोपी मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचने आज(मंगळवार) शाहरुखला उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून ताब्यात घेतले. शाहरुखने 24 फेब्रुवारीला जाफराबादमध्ये पोलिस जवानांनावर बंदुक रोखली होती आणि 8 राउंड फायर केले होते. मागील 8 दिवसांपासून तो फरार होता.


यापूर्वी क्राइम ब्रांचला शाहरुख बरेलीमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. यावर दिल्ली पोलिस आणि क्राइम ब्रांचची 10 पथके त्याचा शोध घेत होती. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शाहरुख फायरिंगनंतर पानीपत, कैराना, अमरोहा अशा अनेक शहरात लपत होता. अखेर त्याला बरेलीमधून अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...