आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांच्या कट कारस्थानाला चपराक देणार दिल्ली पोलिसांची ही हायटेक बस, कमाल आहेत बसचे फीचर्स; इतका आला खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  देशाची राजधानी दिल्ली सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील शहर मानले जाते. यामुळे दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी एक हाट-टेस बस पोलिस ताफ्यात सामिल करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस कमिश्नर अमूल्य पटनायक यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवत रवाना केली. इंडिया गेटवर ही बस तैनात करण्यात आली आहे. 


आपत्नकालीन परिस्थितीत तात्काळ घेणार अॅक्शन

ही बस एक प्रकारची कंट्रोल सिस्टम आहे. या बसच्या मदतीने दहशतवादी हल्ल्यांसारख्या परिस्थितीत तात्काळ अॅक्शन घेता येणार आहे. बसमधील मोबाइल कंट्रोल रूममुळे तात्काळ माहिती पोहचविण्यास, प्रसारित करणे आणि तात्काळ निर्णय घेण्यासाठी फायदेशीर होईल. ही कंट्रोल सिस्टम व्हॅन 6 महिन्यात तयार करण्यात आली असून त्यासाठी 3.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
यामध्ये कॉन्फरन्स रूम, ऑपरेशन सेंटर, इक्विपमेंट सेक्शन, कम्युनिकेशन सेक्शन आणि अत्याधुनिक सर्विलांस सिस्टम देण्यात आले आहे. 


एका सुचनेवर तैनास होणार बस  

एका शॉर्ट नोटिवसवर बसला स्थिर लोकेशनवर तैनात करता येते जेणेकरून लवकरात लवकरा माहिती मिळू शकेल. संपूर्ण जिल्ह्यांसोबत संपर्क साधता यावा तसेच माहितीची देवाण-घेवाण व्हावी यासाठी या बसमध्ये वायरलेस इंटरनेट देण्यात आले आहे. 

 

राष्ट्रीय दिनी ठेवणार सुरक्षा व्यवस्था
या बसचा उपयोग व्हीआयपी सुरक्षा, निवडणूकीच्या काळातील सुरक्षा, विरोध प्रदर्शने, आपत्कालीन व्यवस्था आदि ठिकाणी करत येतो. यासोबतच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सारख्या राष्ट्र दिनानिमित्त कायदा-सुरक्षा व्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी या बसचा उपयोग करता येऊ शकतो. 

 

बसचे फोटोज पाहण्यसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.....

बातम्या आणखी आहेत...