आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जेएनयू हिंसाचाराप्रकरणी तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने शुक्रवारी तपासा संबंधित काही महत्वपूर्ण बाबी माध्यमांसमोर मांडल्या. डीसीपी जॉय टिर्की म्हणाले की, "हिंसा आणि तोडफोड प्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोषसह इतर 9 जणांची ओळख पटली आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही. लवकरच या सर्वांना चौकशीसाठी बोलवले जाईल." या पत्रकार परिषदेनंतर आयशी घोष म्हणाल्या की, "माझ्याकडेही पुरावे आहेत."
डीसीपी टिर्की पुढे म्हणाले की, "जेएनयूमध्ये लेफ्टशी संबंधित 4 संघटना अजूनही आंदोलन करत आहेत. हे लोक नियमांना फाट्यावर मारुन इतरांना त्रास होईल असे कृत्य करत आहेत. स्टूडेंट फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन, ऑल इंडिया स्टूडेंट असोसिएशन आणि डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन या आंदोलनात सहभागी आहेत."
"हे खूप संवेदनशील प्रकरण आहे. यामुळेच तपासादरम्यान आम्ही मीडिया ब्रीफिंगचा निर्णय
घेतला. मीडिया 5 तारखेच्या संध्याकाळपासून घटनेला कव्हर करत आङे. त्यापूर्वीदेखील मारहाण आणि तोडफोडीच्या घटना झाल्या. 4 विद्यार्थी संघटना प्रदर्शन करत होत्या. ते लोक कोणालाच रजिस्ट्रेशन करू देत नव्हते. जर कोणी प्रयत्न केला तर त्याला धमकावून हकलून लावले जायचे. या आंदोलकांनी 3 आणि 4 जानेवारीला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये घुसून तोडफोड करत सर्वर रूममध्ये सर्व सामानाची नासधूस केली. तसेच, नंतर त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांनाही मारले."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.