आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकित शर्मा हत्येप्रकरणी ५ आरोपींना झाली अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पूर्व दिल्लीत गेल्या महिन्यातील हिंसाचारातील आयबी कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक केली. त्यापैकी चार आरोपी चांदबाग तर एक आरोपी मुस्तफाबादच्या अनस येथील आहे. तत्पूर्वी शुक्रवारी पोलिसांनी सलमानला अटक केली होती. त्याची चौकशी केली जात आहे. शर्मा यांच्यावर १२ वेळा सुरीने वार केल्याचे व्रण असून त्यात त्यांना एकूण ५१ घाव सोसावे लागले. त्यांच्यावर लोखंडी सळई, चाकूने हल्ला झाला होता. त्यांची उत्तरीय चाचणी जीटीबी रुग्णालयात करण्यात आली होती. चांदबाग भागातील गुंड मुसा व सलमान यांच्यात मोबाइलवरून संभाषण झाले होते. हे संभाषण पोलिसांनी टॅप केले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती. 
कडकड्डूमा न्यायालयाने हिंसाचार प्रकरणात तीन आरोपींची १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना एक दिवसाची रिमांड संपल्यामुळे कोर्टासमाेर हजर केले होते. 

अलिगडमध्ये सीएएविरोधी निदर्शकांचा मृत्यू :


उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये गेल्या महिन्यात सीएएविरोधी निदर्शनांदरम्यान पोलिसांसोबतच झालेल्या धुमश्चक्रीत एका निदर्शकाचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर पोलिसांनी जुन्या शहरातील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांच्या मते २२ वर्षीय मोहंमद तारिक मुनव्वरचा एमएयूच्या रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तो व्हेंटिलेटरवर होता. २३ फेब्रुवारीला सीएएविरोधी निदर्शनांदरम्यान त्याला गोळी मारली होती. पोलिसांनी मुनव्वर याच्यावरील गोळीबार प्रकरणात गुरुवारी भाजपच्या एका नेत्याला अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...