आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Triple Murder Murderer Hated Parents Sister Murder Of Family For Friendship

दिल्ली ट्रिपल मर्डरध्ये नवीन खुलासा : 19 वर्षीय आरोपीने 12 मित्रांसोबत मिळून मौजमस्ती करण्यासाठी घेतली होती एक 'गुप्त' खोली, ग्रुपमध्ये मुलीही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीतील वसंतकुंज परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या ट्रिपल मर्डरकेसमध्ये एक नवीन खुलासा समोर आला आहे. आपल्या आई-वडील आणि बहिणीचा खून करणारा 19 वर्षीय सुरज मौजमस्ती, हुल्लडबाजी करण्यातच दंग राहायचा. त्याचा 12 मित्रांचा एक ग्रुप होता. यामध्ये 4 बालपणीचे मित्र होते आणि काही मुलीसुद्धा होत्या. आरोपी आपल्या कुटुंबाला सोडण्यासाठी तयार होता परंतु मिंत्राच्या ग्रुपला नाही. सुरजने वडील मिथिलेश (40), आणि सिया आणि बहीण नेहा (16) यांचा चाकू आणि कात्रीने वार करून खून केला आहे.


- सर्व मित्रांनी मिळून घराजवळच वसंतकुंज परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. या ठिकाणी हे सर्वजण मजामस्ती करायचे. मुलाच्या या फ्रेंड सर्कलचा वडील मिथिलेश कडाडून विरोध करत होते. पोलिसांनी या रूमवर छापा मारून बिअरच्या रिकाम्या बॉटल आणि हुक्का जप्त केला आहे. या सर्वांना ऑनलाईन गेम्सचा नाद लागला होता. डीसीपी देवेंद्र आर्य यांच्यानुसार, गुरुवारी सुरजला कोर्टात हजर करण्यात आले. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.


- व्यसनाच्या अधीन गेलेल्या सूरजला वडिलांनी बारावीला नापास झाल्यामुळे खूप मारले होते. तेव्हाच त्याने वडिलांचा मर्डर करण्याचा निश्चय केला होता. सुरजने क्राईम पेट्रोल पाहून संपूर्ण प्लॅन तयार केला होता. सुरुवातील घरातील कात्री आणि चाकू लपवून ठेवला. त्यानंतर पहाटे तीन वाजता सर्वात पहिले बहिणीचे तोंड दाबून तिची चाकूने हत्या केली. अशाचप्रकारे आई आणि वडिलांचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...