आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DU च्या विद्यार्थिनीने केले 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण, व्हॉट्सअॅपवर मागितली 5 कोटींची खंडणी, लपविण्यासाठी भाड्याने घेतली खोली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी 3 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचे गूढ पोलिसांना सोडवण्यात यश आले आहे. राजधानीच्या दक्षिण-पश्चिम परिसरात झालेल्या या प्रकरणात 24 तासांत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अवघ्या 3 मुलांचे अपहरण करणारी आरोपी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी निघाली. पोलिसांनी तिच्यासह एका अल्पवयीन मुलाला देखील अटक केली. ती दिल्ली विद्यापीठात B.Com च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तर अल्पवयीन आरोपी तिचा भाऊ आहे. डीसीपी देवेंद्र आर्य यांनी सांगितल्याप्रमाणे, 11 ऑक्टोबर रोजी 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांना मिळाली होती. 


व्हॉट्सअॅपवर मागितली 5 कोटींची खंडणी
आपल्या घराजवळ खेळणारा मुलगा 11 ऑक्टोबरला बेपत्ता झाला होता. वडिलांनी त्याचा खूप शोध घेतला. दिवसभर पत्ता लागला नाही. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मुलाचे अपहरण झाल्याचा पत्ता लागला. अपहरणकर्ते मुलाच्या वडिलांशी व्हॉट्सअॅपवर संपर्कात होते. त्यांनी सुरुवातीला कॉल करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. यानंतर व्हॉट्अॅपवरूनच मेसेज पाठवत होते. मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपींना अटक केली. 


भाऊ-बहिणीने रचला होता अपहरणाचा कट
आरोपी तरुणीने आपल्या लहान भावाला सोबत घेऊन अपहरणाचा कट रचला होता. आपल्या घराजवळच खेळणाऱ्या 3 वर्षीय मुलाला तिने उचलून नेले. या मुलाला लपविण्यासाठी तिने घराजवळच एक रुम भाड्याने घेतली होती. याच ठिकाणावरून ती मुलाच्या वडिलांना खंडणी मागत होती. ऑगस्टपासून ती या अपहरणाचा कट रचत होती असे तिने स्वीकारले आहे.

बातम्या आणखी आहेत...