आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Violence Speaker Om Birla Today Latest News And Updates Lok Sabha BJP Congress Members

दिल्लीच्या मुद्द्यावरून गदारोळ: 7 काँग्रेस खासदारांचे निलंबन; अधिवेशनापर्यंत येऊ शकणार नाहीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सलग चौथ्या दिवशी सुद्धा गदारोळ झाला. यात विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या खासदारांनी दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा लावून धरला. यानंतर वाढता गदारोळ पाहता लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. यामध्ये खासदार गौरव गोगोई, टीएन प्रथपन, डीन कुरिआकोस, बेनी बेहनन्म, मनिकम टागोर, राजमोहन उन्नीतन आणि गुरजीत सिंह औजला यांचा समावेश आहे.

लोकसभेत काँग्रेसकडून विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी या कारवाईचा निषेध केला. संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "आम्हाला दिल्लीतील हिंसाचार प्रकरणावर चर्चा हवी होती. सरकारला वारंवार चर्चेसाठी विनंती करत आहोत आणि आता लोकसभा अध्यक्षांनी असे (7 खासदारांचे निलंबन) केले. आम्ही भिकारी नाहीत. हे लोकसभा अध्यक्ष महोदयांना सुद्धा कळायला हवे." काँग्रेससह विरोधी पक्षांचे खासदार सुद्धा संसदेत दिल्लीत हिंसाचारावर सरकारला चर्चा करण्याचे आवाहन करत आहेत. परंतु, होळीपूर्वी ते शक्य नाही आणि योग्य देखील नाही असे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. या मुद्द्यावर 11 मार्च रोजी चर्चा केली जाईल अशी खात्री लोकसभा अध्यक्षांकडून आधीच देण्यात आली आहे.

दिल्ली हिंसाचार आणि आर्थिक परिस्थितीवरून संसदेचे अधिवेशन वादळी ठरत आहे. सरकार आणि विरोधकांच्या वाढत्या वादांमुळे केवळ गदारोळ आणि कामकाज तहकूब करण्यामध्येच वेळ जात आहे. यात सर्वात मोठा वाद सोमवार आणि मंगळवारी झाला होता. सरकार आणि विरोधी पक्षांच्या खासदारांना वादात एकमेकांवर कागदे भिरकावली होती. यासोबतच, महिला खासदारासोबत कथित धक्काबुक्कीच्या आरोपांवरून सुद्धा लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...