आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kiss करण्याच्या बहाण्याने पतीची जीभ चावून तोडली; महिलेला कायद्याने मिळू शकते ही शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील रनहोला परिसरात एका पत्नीने किस करण्याच्या बहाण्याने पतीची जीभ आपल्या दातांनी तोडून वेगळी केली. पीडित पतीला गंभीर जखमी अवस्थेत सफदरगंज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. तरीही तो पुन्हा बोलू शकणार की नाही याची खात्री देता येणार नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, महिलेला आपला पती चांगला दिसत नव्हता. त्यामुळेच तिने हे कृत्य केले. विशेष म्हणजे, आरोपी पत्नी 8 महिन्यांची गर्भवती आहे. अशात महिलेला कायद्यानुसार कोणती शिक्षा होऊ शकते याचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


मध्य प्रदेश हायकोर्टात ज्येष्ठ वकील असलेले संजय मेहरा यांच्या मते, पती-पत्नी या घटनेवरून घटस्फोट घेऊ शकतात. कारण हे प्रकरण क्रूरतेचे आहे. हिंदू मॅरेज अॅक्टच्या कलम 13बी नुसार, यास घटस्फोटाचे कारण मानता येईल. हा कायदा पती आणि पत्नी अशा दोहोंना लागू होतो. या व्यतिरिक्त पीडित पती भारतीय दंड विधानानुसार खटला सुद्धा दाखल करू शकतो. मारहाणीशी संबंधित 5 कलमांविषयी आपण जाणून घेत आहोत. 


दाताने चावणे कायदेशीर गुन्हा
> एखादी व्यक्ती व्यक्ती कुणाला घातक शस्त्राने वार करून जखमी करत असेल तर त्याच्या विरोधात भादवी कलम 324 लावली जाऊ शकते. यात दातांनी चावा घेणे, धारदार शस्त्राने हल्ला करणे, एखाद्या जीव-जंतूने चावायला लावणे इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये 3 वर्षांच्या कैदेची तरतूद आहे.
> एखाद्या धारदार शस्त्राने हल्ला केल्यास आणि गंभीर जखम झाल्यास भादवी कलम 325 लागते. यात 7 वर्षांपर्यंतच्या कैदेची तरतूद आहे. 
> घातक शस्त्राने हल्ला करणे किंवा हल्ल्यात स्फोटकांचा वापर केल्यास आयपीसी कलम 326 लागू होत असते. यामध्ये किमान 10 वर्षे ते जन्मठेपेची तरतूद आहे. 
> एखाद्या व्यक्तीसोबत धक्काबुक्की करणे, चापट मारणे यासाठी आयपीसी कलम 323 लागू होत असते. यामध्ये पोलिस थेट खटला दाखल करत नाहीत. कोर्टाच्या आदेशानंतरच खटला दाखल केला जाऊ शकतो.
> एखाद्या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्यास आयपीसी कलम 307 लागू केली जाते. यामध्ये जन्मठेप सुद्धा सुनावली जाऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...