आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Woman Cop Shot Dead Near Rohini East Metro Station, Investigation On News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला पोलिस उपनिरीक्षकावर गोळ्या झाडणारा निघाला तिच्याच बॅचचा अधिकारी, त्याचाही मृतदेह सापडला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या रोहिणी मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या खून प्रकरणी शनिवारी नवीन माहिती समोर आली आहे. मेट्रो स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री 26 वर्षीय सब इंस्पेक्टर प्रिती अहलावतची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्रकरण सुरुवातीपासून वैयक्तिक वैमनस्याचे वाटत होते. पोलिसांनी तपास केला, तेव्हा संशयित हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे. विशेष म्हणजे, हा हल्लेखोर त्याच महिला अधिकाऱ्याच्या बॅचचा पोलिस अधिकारी होता. प्राथमिक तपासात त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती 2018 बॅचची पोलिस उपनिरीक्षक होती. ती रोहिणी परिसरातील सेक्टर 8 मध्ये राहत होती. तिची पोस्टिंग पटपडगंज इंडस्ट्रिअल एरियाच्या पोलिस स्टेशनमध्ये होती. ती गुरुवारी रात्री 8:30 वाजता जवळच्या मेट्रो स्टेशनवर गेली होती. सिव्हिल ड्रेसमध्ये असतानाच एका तासानंतर तिच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. प्रितीला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला पोहोचताच मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान त्यांना पोलिस उपनिरीक्षक दीपांशू राठीचा मृतदेह सापडला. दीपांशू राठी हाच प्रितीचा मारेकरी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. विशेष म्हणजे, दीपांशूने सुद्धा 2018 मध्ये पोलिस दलात प्रवेश केला होता. तो प्रितीचाच बॅचमेट होता. त्याने ही हत्या का केली असावी याचा सध्या तपास केला जात आहे.