आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'यापूर्वी फक्त ब्लड डोनेशन विषयी ऐकले होते', 22 वर्षांचा हा मुलगा असा बनला 'विकी डोनर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वर्ष 2012 मध्ये आलेले विकी डोनर चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल. चित्रपटात विकी नावाच्या एक पंजाबी मुलाची भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमान खुराणाने स्पर्म डोनेटरचे आयुष्य दाखवले होते. परंतु आज आम्ही तुम्हाला रिअल लाइफमधील स्पर्म डोनेटरविषयी सांगत आहोत. याचे वय फक्त 22 वर्षांचे आहे. दिल्लीमध्ये राहणार हा तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तरुणाने सांगितले की, ' मी एक छोट्याशा गावातून आलो आहे आणि आमच्या भागात लग्नापूर्वी एखाद्या मुलीसोबत संबंध स्थापित करणे फार अवघड काम आहे.


एकदा या तरुणाने वृत्तपत्रामध्ये स्पर्म डोनेशनची बातमी वाचली. तरुणाने सांगितले की, यापूर्वी मी फक्त ब्लड डोनेशन विषयी ऐकले होते, कधीही स्पर्म डोनेशनविषयी वाचले किंवा ऐकले नाही. ही बातमी वाचून त्याने स्पर्म डोनेशन सेंटर्सशी आणखी माहिती गोळा केल्यानंतर त्याला समजले की, त्याच्या घराजवळच एक सेंटर आहे. स्पर्म डोनेशन सेंटरमध्ये जाऊन त्याने याविषयी संपूर्ण माहिती घेतले. तरुण शरीराने तंदुरुस्त होता, परंतु स्पर्म डोनेट करण्यासाठी शरीर आतूनही मजबूत असणे आवश्यक आहे. सेंटरमधील काही डॉक्टरांनी तरुणाच्या काही टेस्ट केल्या आणि त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.


दुसऱ्या दिवशी तरुण डोनेशन सेंटरवर पोहोचला. एकावेळेस स्पर्म डोनेट करण्याचे त्याला 400 रुपये मिळाले. त्यानंतर त्याचे हे काम सुरु झाले. तरुणाने सांगितले की, डोनेशन करण्याचे मला समाधान मिळत होते कारण यामुळे एक महिला आई होणार होती. या कामामध्ये काहीही वाईट नसल्याचे तरुणाने सांगितले परंतु समाजातील काही लोक स्पर्म डोनेशनचे महत्त्व कधीच समजू शकणार नाहीत अशी खंतही व्यक्त केली. स्पर्म डोनेट करणे हा कोणताही गुन्हा नाही, परंतु याविषयी कोणाला सांगणेही खूप वाईट अनुभव ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...