आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhl Top Cop Rapes Criminal’s Wife On Pretext Of ‘helping Her’ After Husband\'s Demise

धक्कादायक: गुंडाच्या पत्नीवर ACP ने केला बलात्कार, दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांतील सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) वर एका महिलेने बलात्कार, लहान मुलाचे अपहरण करणे, तसेच मुलीसोबत छेडछाड केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

 

असे आहे प्रकरण

रमेश दहिया असे या एसीपींचे नाव आहे. आरोप आहे की, एका विधवा महिलेवर एसीपीने बलात्कार केला. यानंतर तक्रार करू नये म्हणून लग्नाचे आमिष दाखवले. परंतु यानंतर एसीपीने लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या पतीवर अनेक गुन्हे दाखल होते. यामुळे ती तुरुंगात पतीला भेटायला यायची. परंतु आजारपणात तिच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर एसीपी महिलेच्या घरी येऊ-जाऊ लागला. तिच्या मजबुरीचा गैरफायदा घेत एसीपीने तिच्यावर बलात्कार केला. रमेश दहियाला नुकतेच एसीपी पदावर प्रमोशन मिळाले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, जिवे मारण्याचा प्रयत्न, मुलाचे अपहरण आणि पॉक्सो अॅक्टसहित इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपवण्यात आले आहे.

 

पीडितेचा पती होता क्रिमिनल, मृत्यूनंतर एसीपीने वाढवली जवळीक
सूत्रांनुसार, 33 वर्षीय शबनम (बदललेले नाव) ती तिच्या 4 मुलांसोबत राहते. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, 2 नोव्हेंबर 2016 रोजी तिची भेट पोलिस स्टेशन इंचार्ज रमेश दहियाशी झाली होती. आरोपी तेव्हा ठाणेदार होता. काही दिवसांनंतर रमेश दहियाने शबनमच्या घरी ये-जा सुरू केली. यादरम्यान 16 मार्च 2017 रोजी तिच्या पतीचा आजारपणात मृत्यू झाला. एप्रिल 2017 मध्ये आरोपी रमेश दहिया शबनमच्या घरी आला आणि गुंगीचे औषध खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला.

 

पीडितेला केले ब्लॅकमेल, व्हिडिओ बनवून द्यायचा धमकी

पीडितेचा आरोप आहे की, यादरम्यान आरोपीने मोबाइलमधून तिचा व्हिडिओ बनवला. पीडितेने आपल्या तक्रारीत सांगितले की, या व्हिडिओच्या आधारे आरोपी तिला ब्लॅकमेल करू लागला. त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने सातत्याने याचा विरोध केला, तेव्हा आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्ायन, ती जुलै 2017 मध्ये गर्भवती झाली. यावर आरोपीने पीडितेला गर्भपात करण्याचे सांगितले. परंतु पीडितेने नकार दिला.

Delhi: Case registered against Delhi Police ACP Ramesh Dahiya for allegedly raping a woman on the pretext of marriage, molesting her minor daughter, & kidnapping their son. The woman had filed an initial complaint of rape against him last month. Investigation underway

— ANI (@ANI) September 20, 2018

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...