आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delivery Of House Ration To Delhi, Help For Cleaning Workers, AAP Declares Manifesto

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीला घरपोच रेशन, सफाई कामगारांसाठी मदत देऊ, मतदानाच्या ४ दिवस आधी आपचा जाहीरनामा

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आलेली असतानाच आम आदमी पार्टीने मंगळवारी आपला जाहीरनामा घोषित केला. त्यात देशभक्तिपर आधारित शालेय अभ्यासक्रम सुरू करण्याचा मनोदय आपने व्यक्त करतानाच कर्तव्यावर मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या कुटुंबीयांसाठी १ काेटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल. रेशन घरपोच देऊ, असे जाहीर करण्यात आले. दिल्लीकर पक्षाला पुन्हा सत्ता देतील, असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष शिसाेदिया यांनी व्यक्त केला. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. शिसाेदिया म्हणाले, दिल्ली विधानसभेत आधीच लोकपाल विधेयक मंजूर झाले आहे, परंतु २०१५ पासून ते केंद्र सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. चार वर्षे उलटली आहेत. या विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी आप सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. सामान्य माणसाचे जगणे सहज व्हावे. सामान्य माणसे आनंदाने जगावेत यासाठी आवश्यक ताे दृष्टिकाेन आपकडे आहे.त्यातून दिल्ली आधुनिक राजधानी कशी हाऊ शकेल, यासाठी सरकारने प्रयत्न केले, असे शिसाेदिया यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेसाठी ७० जागांसाठी ८ फेब्रुवारी राेजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. ११ फेब्रुवारी राेजी मतमोजणी केली जाणार आहे.भाजपने मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करावा : केजरीवाल 

पक्षाचा जाहीरनामा घोषित झाल्यानंतर केजरीवाल पत्रकारांना म्हणाले, लोकशाहीत जनताच सरकार निवडते. परंतु, अमित शहा यांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आपण ठरवू, असे म्हटले आहे. खरे तर लोकशाहीत जनताच मुख्यमंत्र्यांची निवड करत असते. म्हणूनच शहा मुख्यमंत्र्यांची निवड करू शकत नाहीत. लोकशाहीत चर्चा करणे महत्त्वाचे असते. मी त्यासाठी भाजपला चेहरा जाहीर करण्यासाठी बुधवारपर्यंतच्या मुदतीचे आव्हान देताे. भाजप सत्तेवर येताच मुख्यमंत्री करणार आहे? हे लोकांना समजलेच पाहिजे, असे केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही दिल्लीला २१ व्या शतकातील शहर बनवू इच्छिताे. ते आम्ही एकट्याच्या बळावर साध्य करू शकत नाहीत. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. 
 

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

  • घरपाेच रेशन सामग्री.
  • ज्येष्ठ नागरिकांना १० लाखांपर्यंतची मदत
  • चाेवीस तास बाजारपेठ खुली राहील.