आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demand For Election Commission Of Dhananjay Munde To Put Jammer In Ballot Boxes And Around Polling Booths

मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा, धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर EVM हॅकींगचा मुद्दा परत समोर आला आहे. ''विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत,'' अशी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

मागील काही निवडणुकांपासून भाजपवर EVM हॅकिंगचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान मशीनसोबत मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून, निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राहावी, या दृष्टीने आयोगाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत. तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा (21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर) पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.