• Home
  • Business
  • Demand for land and labor reforms after tax deduction, real estate consolidation

आर्थिक सुधारणा / कर कपात, रिअल इस्टेटच्या दिलाशानंतर जमीन आणि कामगार सुधारणांची मागणी

सीतारमण यांनीही दिला सुधारणेवर भर सीतारमण यांनीही दिला सुधारणेवर भर

अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नांवर सरकारला स्तुतीसाेबत सल्लेही मिळत आहेत
 

Nov 08,2019 09:13:00 AM IST

नवी दिल्ली - जागतिक आर्थिक मंदीत केंद्र सरकार भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सतत पाऊल उचलत आहे. कंपनी करातील कपातीसोबत अर्धवट रिअल इस्टेट प्रकल्पाच्या मदतीसाठी २५ हजार कोटींच्या पॅकेजचा यात समावेश आहे. भारतीय उद्योगजगत आणि बाजारपेठ तज्ज्ञांनी याची प्रशंसाही करत आहेत. असे असले तरी आता ते सरकारकडून याबाबतीत आणखी काही पावले उचलण्याची आशा करत आहेत. तज्ज्ञांनुसार, भूसुधार आणि कामगार सुधारणा करणे सरकारच्या प्रस्तावित निर्णयांत समाविष्ट होऊ शकतात.

नव्या कारखान्यासाठी जमीन उपलब्ध होणे सोपे व्हावे

सरकारने नवा कारखाना सुरू करणाऱ्या कंपन्यांवर कंपनी कराच्या दरात घट करून १५% केला आहे. तज्ज्ञांनुसार, हा एक चांगला निर्णय आहे आणि यामुळे देशात उद्योगाच्या बाजूने वातावरण तयार होईल. मात्र, नव्या कारखान्यासाठी जोपर्यंत जमीन मिळणे सोपे होईल तेव्हाच या निर्णयाचा उद्देश साध्य होईल. अनेक तज्ज्ञांनुसार, सुधारणा वर्षअखेरच्या महिन्यांत शक्य आहे.

१९७१ नंतर देशात भूमी सुधारणा नाही

भूसुधारणेशिवाय वेगवेगळ्या उद्योगासाठी तज्ज्ञांनी कामगार सुधारणेवरही लवकर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. भारतात १९७१ नंतर कामगार सुधारणेवर विशेष लक्ष दिले गेले नाही. बहुतांश राजकीय पक्ष या मुद्याला हात घालण्यास धजावत नाहीत. तज्ज्ञांनुसार, हिवाळी अधिवेशन व अर्थसंकल्पीय अधिवेशनाशी संबंधित निर्णय घेतले जाऊ शकतात.

वैयक्तिक प्राप्तिकराच्या कपातीची शक्यता

विद्यमान सरकारने कंपनी करात कपात केली. यामुळे आर्थिक अडचणी सोसणाऱ्या अनेक कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी, मागणी वाढण्यात अद्यापही काही अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे दीर्घकाळापासून वैयक्तिक प्राप्तिकरातील कपातीमुळे कंपन्यांना पैसा मिळाला आहे. प्राप्तिकरातील कपातीमुळे जनतेकडे पैसा येईल. यानंतर दुप्पट वेगाने सुधारणा दिसू शकेल.

सीतारमण यांनीही दिला सुधारणेवर भर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी रिअल इस्टेटसाठी मदत पॅकेजची घोषणा केल्यानंतर सरकार आता सुधारणेच्या मुद्द्यावरही मागे हटणार नसल्याचे म्हटले होते. त्यांनी सांगितले होते की, सरकार लवकरच बळकट जनादेशाचा वापर करत सुधारणेच्या नव्या टप्प्याची सुरुवात करेल. सरकार गेल्या वेळी सुधारणेच्या संधी प्राप्त करू शकली नाही, या वेळी मात्र तसे होणार नाही.

X
सीतारमण यांनीही दिला सुधारणेवर भरसीतारमण यांनीही दिला सुधारणेवर भर