आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामासाठी लैंगिक संबंधाची मागणी समजली जाईल लाच, सात वर्षांचा तुरुंगवासही शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कामासाठी लैंगिक संबंधाची मागणी करणे अथवा ती मान्य करणेसुद्धा लाच मानली जाईल. नव्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अशा प्रकरणात सात वर्षांचा तुरुंगवासही भाेगावा लागू शकतो. 


एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. लाचेची व्याख्या फक्त आर्थिक लाभ अथवा पैशाच्या स्वरुपात दिसणारी संपत्ती इतकीच मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती)कायदा, २०१८ मध्ये 'अनुचित लाभ' असा शब्द जोडला आहे. महागड्या क्लबचे सदस्यत्व आणि पाहुणचार हीसुद्धा लाच समजली जाणार आहे. नव्या कायद्यानुसार लैंगिक सुखाची मागणी करणे अथवा जवळच्या मित्र-नातेवाइकांना रोजगार मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. 


सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ जी. व्यंकटेश रवा यांनी म्हटले, कोणताही गैर-आर्थिक फायदा, महाग भेटवस्तू, मोफत सुट्याची तरतूद, विमानाचे तिकिट आणि लॉजमध्ये उतरण्याची व्यवस्था यासारख्या गोष्टींचा अनुचित लाभाच्या कक्षेत येईल. 

बातम्या आणखी आहेत...