आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रीत दुचाकींच्या मागणीत ९% वाढ, दिवाळीपर्यंत १४ टक्के वाढीचा अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर दुचाकींच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये विक्री १४ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. हे पाहता दुचाकी निर्मात्या कंपन्यांनीही दिवाळीपर्यंत बाइक आणि स्कूटर खरेदीवर विविध ऑफर सुरू केल्या आहेत. नवरात्रोत्सवात ऑगस्ट महिन्याच्या  तुलनेत सप्टेंबरमध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत ९ टक्के वाढ झाली होती.

किफायतशीर फायनान्स, कॅश डिस्काउंट, कॅश बॅक, एक्स्चेंज ऑफरपासून मोफत विमा आदींद्वारे १५ हजार रुपयांपर्यंतचे फायदे ग्राहकांना दिल्याचा दावा कंपन्या करत आहेत. सोसायटी आॅफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स(सियाम)नुसार साधारण सर्व प्रमुख दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यामध्ये उदाहरण द्यावयाचे झाल्यास हीरो मोटोकॉर्प, होंडा माेटारसायकल अँड स्कूटर इंडिया आणि बजाज ऑटोने सप्टेंबर २०१९ च्या विक्रीत वृद्धी नोंदवली. असे असले तरी सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत एकूण दुचाकी वाहनांच्या विक्रीत २१ टक्के घसरण आली आहे. सर्व मॉडेल्सवर एक्स्चेंज आॅफर, कॅश डिस्काउंट आदी १०,००० रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. 

पेटीएमद्वारे देयक ऑनलाइन केल्यास ७ हजार रुपयांची अतिरिक्त सवलतीचा लाभही मिळू शकतो. जास्त जोर स्वस्त फायनान्सवर आहे. हीरोने फायनान्स कंपनीसोबत मिळून ६.९९%चा व्याजदर ठेवला, तर होंडाने एचडीएफसीसोबत फ्लॅट ८% व्याजाचा दर ठेवला आहे.
 

हीराेच्या विक्रीत झाली सर्वात जास्त वाढ
हीरो मोटोकॉर्प या देशातील सर्वात माेठ्या माेटार उत्पादक कंपनीने सप्टेंबर २०१९ मध्ये ६,१२,२०४ वाहनांची विक्री केली. तर अाॅगस्ट २०१९मध्ये ५,४५,४०६ विक्री झाली हाेती. १२.६६ टक्के वाढीची नाेंद केली अाहे. सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत विक्री अजूनही ती १८.२१ टक्क्यांनी कमी अाहे. त्या वेळी कंपनीने ७,४८,५३५ युनिट‌्सची विक्री केली हाेती. हाेंडा या देशातील दुसऱ्या सर्वात माेठ्या बाइक उत्पादक कंपनीने गेल्या महिन्यात ४,५५,८९२ युनिटची एकूण विक्री केली. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्येे ७.५० टक्के वृद्धी पाहावयास मिळाली. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण ४,२५,६६४ वाहनांची विक्री केली होती.
 
 

सणासुदीत सवलतीमुळे विक्री आणखी वाढेल, ग्राहकांकडून चौकशी वाढली
एकामागोमाग एक महिन्यानंतर वृद्धी हा ऑटो उद्योग रुळावर येत असल्याचा संकेत देते. भोपाळ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष पांडे म्हणाले, दिवाळीसाठी टू व्हीलरच्या चौकशीत वाढ झाली आहे. कंपन्यांच्या डिस्काउंट आॅफरमुळेही ग्राहक खरेदीसाठी उत्सुक आहेत. दिवाळीपर्यंत विक्रीत १४ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. विक्रेते विशाल जौहरी म्हणाले, दुचाकीसोबत स्कूटरचाही ट्रेंड आहे.
 
कंपनी - ऑफर/सूूट
> हीरो: 10000 (1500 रु. कॅश डिस्काउंट, पेटीएम,एक्स्चेंज ऑफर) {होंडा: 8900 (फायनान्सवर)+2100 जॉय क्लब+7000 पेटीएम 
> टीव्हीएस:  9000 (फायनान्स)+कॅश डिस्काउंट
 

कंपनी     विक्री ऑगस्ट     सप्टेंबरमध्ये
हीरो  :   543406  -  612204 
होंडा  :   425664  -  455892
टीव्हीएस  :   219558  -   243163
बजाज  :   173024  -   177348
 
 

बातम्या आणखी आहेत...