आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ लाख खातेदारांना विमा सुरक्षेची मागणी; पीएमसी बँकप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - ४,३५५ कोटी रुपयांच्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचा (पीएमसी) घोटाळा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. बँकेत अडकलेल्या रक्कम प्रकरणात तत्काळ सुनावणी आणि आवश्यक उपाय करण्यासाठी निर्देश दिले जाण्याची मागणी करत खातेदारांनी बुधवारी याचिका सादर केली. त्यावर सहमती दाखवत या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी करू, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर तीन जणांचे प्राण गेले आहेत. घोटाळा समोर आल्यानंतर लोक आपली रक्कम मिळवण्यासाठी रस्त्यांवर सतत निदर्शने करत आहेत. या प्रकरणात १५ लाख पीडितांना संरक्षण आणि १००% विमा कवच दिले जावे.

माजी अध्यक्षासह ३ आरोपींना २३ पर्यंत कोठडी :
पीएमसी घोटाळ्यात मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आरोपींमध्ये हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) अध्यक्ष आणि एमडी राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वधावन आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह यांचा समावेश आहे.